माण तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार अल्पवयीन चुलत भावासह पोलिसात गुन्हा दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, दहिवडी, दि.२४: बिदाल, ता. माण येथील अल्पवयीन मुलीवर दोघांनी वेळोवेळी अत्याचार केला. यातून पीडिता गर्भवती राहिली. याप्रकरणी मुलीचा अल्पवयीन चुलतभाऊ व त्याचा मित्र यांच्याविरोधात दहिवडी पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी 19 वर्षीय आरोपीला अटक केली असून त्यास वडूज सत्र न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी दिली आहे. दुसर्‍या विधीसंघर्ष बालकास न्याय मंडळाने बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित मुलगी घरात एकटी असताना फिर्यादीचे शेजारी राहणार्‍या दोघांनी वेळोवेळी तिला धमकी देऊन जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले आहे. आरोपी चुलतभाऊ मुलीला ब्लॅकमेल करून पीडित मुलीशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले आहेत. पीडित मुलगी सातवीच्या वर्गात शिकत आहे तर अल्पवयीन चुलत भाऊ व 19 वर्षीय याच गावातील त्याचा मित्र यांनी मिळून केलेल्या अत्याचारातून ही अल्पवयीन मुलगी सात महिन्याची गर्भवती असल्याचे समोर आले आहे.

मुलीच्या आईने रात्री उशिरापर्यंत दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून या दोन संशयीतांना ताब्यात घेतले आहे. यातील 19 वर्षीय आरोपीला अटक झाली असून वडूज सत्र न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी दिली आहे. दुसर्‍या विधीसंघर्ष बालकास न्याय मंडळाने बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ तपास करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!