दैनिक स्थैर्य | दि. २४ जून २०२३ | फलटण |
राजुरी (ता. फलटण) येथे किरकोळ कारणावरून दोन गटात लोखंडी गज, काठीने मारामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी १२ जणांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद योगीराज चिमाजी साळुंखे (वय ५१, रा. भवानीनगर, राजुरी) यांनी पोलिसात दिली आहे.
धनंजय सखाराम पवार, सुरेश विष्णू पवार, शंकर विष्णू पवार, सचिन शंकर पवार, पांडुरंग रघुनाथ पवार, दौलत धनंजय पवार, ऋषिकेश जालिंदर पवार, संचित नारायण पवार, संजय रमेश पवार, चैतन्य सुरेश पवार, प्रशांत सुरेश पवार व सुभाष भिकू पवार (सर्व राहणार भवानीनगर, राजुरी, ता. फलटण) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २०/०६/२०२३ रोजी सायंकाळी ८.०० वाजता दरम्यान माझा पुतण्या विजय पोपट साळुंखे याचा वाढदिवस असल्याने आम्ही स्वराज हॉटेल येथे जेवण करण्यासाठी गेलो असताना तेथे नितीन साळुंखे, सुभाष पवार व सचिन पवार यांच्यात अधिराज ढाब्यासमोर झालेल्या भांडणावरून दिनांक २१/०६/२०२३ रोजी ००.१५ वाजण्याच्या सुमारास आम्ही आमच्या घरातील हॉलमध्ये बसलो असताना वरील आरोपी हे सर्वजण घरात आले व आम्हाला शिवीगाळ दमदाटी करत धनंजय सखाराम पवार यांनी हातातील काठीने माझ्या डावे हाताचे कोपर्यावर मारले व त्याचे सोबत असलेले सर्व इसमांनी लाकडी दांडके, लोखंडी गजाने मला तसेच राजेश बबन पोळ, सागर शहाजी साळुंखे, संग्राम साळुंखे यांना बेदम मारहाण केली. सदर भांडणे सोडवण्यासाठी माझी पत्नी आली असता त्यांनाही शिवीगाळ, दमदाटी करून धक्काबुक्की केली. तसेच माझे क्रेटा गाडीची मागील काच त्यांच्यातील कोणीतरी फोडली. सदर भांडणात माझ्या हातातील अंगठी, सागर साळुंखे यांची दोन तोळ्याचे चेन व राजेश बबन पोळ यांची साडेतीन तोळ्याची चेन गहाळ झाली आहे, अशी तक्रार फिर्यादी यांनी पोलिसात दिली आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार चांगण अधिक तपास करत आहेत.