खंडणी प्रकरणी एकावर गुन्हा


दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑगस्ट २०२२ । सातारा । एका वैद्यकीय व्यवसायिकास खंडणी मागितल्या प्रकरणी एकावर खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विलास बाबुराव कदम राहणार धनगर वाडी, तालुका खंडाळा यांचा मुलगा विकी कदम हा मानसी हॉस्पिटल पारगाव तालुका खंडाळा येथे उपचार घेत होता. त्याच्या उपचारासाठी विलास कदम यांनी डॉक्टर महेंद्र संभाजी ढमाळ वय 55 राहणार पारगाव, तालुका खंडाळा यांना वैद्यकीय उपचारकामी खर्चापोटी 74 हजार 226 रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र दिनांक 30 जून रोजी साडेबारा वाजण्याच्या सुमारास विलास कदम यांनी दिलेला धनादेश हा महेंद्र ढमाळ यांना धमकी देऊन परत घेतला. सोबतच त्यांना पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. याबाबतचा गुन्हा खंडाळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एम. ए. क्षीरसागर करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!