
दैनिक स्थैर्य । दि. १६ ऑक्टोबर २०२२ । सातारा । सातारा शहराजवळ असलेल्या एका गावातील महिलेला रस्त्यावर अडवून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी सुजल शीतल बारावडे रा.शनिवार चौक, सातारा याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पीडित महिला ही सातारा शहराजवळील एका मोठ्या गावातील रहिवाशी असून संशयिताने तिचा दि. ५ रोजी दुचाकीवरून पाठलाग केला. दरम्यान तीला एका ठिकाणी थांबवून संशयिताने प्रेमसंबध ठेवण्यास बळजबरी करण्यास सुरूवात केल्याचे फिर्यादी म्हटले आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी करत आहेत.