विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा


दैनिक स्थैर्य । दि. १८ जुलै २०२२ । सातारा । युवतीचा विनयभंग केला. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १४ जुलै रोजी एक युवती व तिचा मित्र सातारा एसटी स्टँड येथे बसची वाट पाहत उभे असताना रोहित निकम वय ३२ रा. मोहितेवाडी ता. कोरेगाव हा तेथे आला आणि तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबतचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मोटे करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!