दैनिक स्थैर्य । दि. २९ ऑकटोबर २०२२ । सातारा । एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजता रवी चंद्रकांत काळोखे वय 27, रा. करंजे पेठ, सातारा हे जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड नंबर 27 मध्ये सौरभ सपकाळ याची विचारपूस करण्याकरता गेले. मात्र सौरभ सपकाळ याने त्याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा राग मनात धरून रवी काळोखे यास चाकू सारख्या धारदार शास्त्राने आणि सौरभ सपकाळ यांचे मित्र मंदार चांदणे (पूर्ण नाव माहित नाही), ओंकार इंगवले (पूर्ण नाव माहित नाही) आणि एक अनोळखी व्यक्ती या चौघांनी मिळून रवी काळोखे यास मारहाण केली. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात संबंधित चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक भोसले करीत आहेत.