
दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑगस्ट २०२२ । सातारा । एकास मारहाण केल्याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक सहा जुलै रोजी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास केतन किशोर पिसाळ वय 22, राहणार व्याजवाडी, तालुका वाई याला जुन्या भांडणाचा राग मनात धरून शिरगाव, तालुका वाई गावच्या हद्दीत आदित्य ढमाळ राहणार खडकी, तालुका वाई याने आणि त्याचे तीन अनोळखी मित्र यांनी शिवीगाळ दमदाटी करून हाताने आणि लोखंडी रॉड ने मारहाण केली. याबाबतचा गुन्हा वाठार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला असून पोलीस नाईक आवळे अधिक तपास करीत आहेत.