भगिनी मंडळ बारामती यांच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १९ जुलै २०२३ । बारामती ।

येथील भगिनी मंडळ बारामती यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात उच्चांकी 121 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित लेट, माणिकबाई चंदुलाल सराफ ब्लड बँक बारामती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा लक्षात घेवून. रक्तदान शिबिरे आयोजित करून ब्लड बँकेत रक्त संकलित केले जाते मात्र रक्तच उपलब्ध नसल्याने गरजू रुग्णांना रक्त पुरवठा करणे अशक्य झाले होते. या पार्श्वभुमीवर ब्लड ब्लड बँकेच्या विनंतीवरुन भगिनी मंडळ बारामती यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

भगिनी मंडळाच्या वतीने अनेक वर्षापासुन समाजोपयोगी उपक्रम राबविली जात आहेत त्याचाच भाग म्हणून ब्लड बँकेच्या गरजेनुसार तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.

शिबिर यशस्वी करण्यासाठी भगिनी मंडळाच्या प्रमुख विश्वस्त सुनीता शहा, अध्यक्षा आरती सातव, सचिव कीर्ती हिंगाने, सहसचिव शुभांगी जामदार, तसेच कस्तुरी टीम व भगिनी मंडळ बारामती यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. भगिनी मंडळ बारामती आयोजित केलेले रक्तदान शिबिर यशस्वी राबविल्या बद्दल ब्लड बँकेचे सचिव डॉ. अशोक दोशी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!