
दैनिक स्थैर्य | दि. 23 जुलै 2025 । फलटण । रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे. जगाच्या बाजरात कुठेही रक्त तयार करता येत नाही ते मानवी शरीरातच दैवी कृपेने तयार होते. आपत्कालीन तथा अपघात किंवा संकटकालीन रूग्णाना रक्ताची आवश्यकता पडते त्यावेळी रक्तदानाचे महत्व लक्षात येते म्हणून सर्वानी रक्तदान करावे, असे मत आमदार सचिन पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार साचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या वतीने महारक्तदान शिबिर आयोजित केले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सचिन पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, डॉ. जे. टी. पोळ, भाजपा तालुकाध्यक्ष बापूराव शिंदे, राष्ट्रवादी प्रदेश चिटणीस रामभाऊ ढेकळे, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा सौ. प्रतिभा चेतन शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राहुल निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या कार्यक्रमास महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना या तिन्ही प्रमुख पक्षाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
महाराजा मंगल कार्यालय येथील या शिबिरास हजारो युवक, युवती तसेच नागरिकांनी उस्फूर्त पणे सहभागी होऊन रक्तदान केले.