स्थैर्य, फलटण, दि. २ : फलटण शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील चौक ते पृथ्वी चौक या दरम्यान असलेले अमोल आईस्क्रीम दुकानाचे समोर डांबरी रोडवर अज्ञात चारचाकी वाहनाने एका 70 वर्षीय वृद्ध महिलेला धडक दिली. दिलेल्या धडकेत ती वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून त्या बाबत फलटण शहर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांनी दिली.
या बाबत अधिक माहिती अशी कि, दिनांक 28.5.2020 रोजी रात्री 23.15 वाजण्याच्या सुमारास फलटण शहरातील नाना पाटील चौक ते पृथ्वी चौक या दरम्यान असलेले अमोल आईस्क्रीम दुकानाचे समोर डांबरी रोडवर अनोळखी चारचाकी वाहनाने अनोळखी चालकाने त्याची ताब्यातील वाहन अविचाराने रस्त्याच्या परिस्थितीकडे न पाहता जोरात चालवून अनोळखी महिला वय अंदाजे 70 वर्ष हि रस्ता क्रॉस करत असताना तिला धडक दिली. अपघात करून अपघातग्रस्तला उपचारास न नेता किंवा अपघाताची खबर पोलीस स्टेशनला न देता तो पळून निघून गेला असून उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला व तो चालक अनोळखी महिलेच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी पोलीस हवालदार विलासराव शिंदे यांच्या फिर्यादीवरून अनोळखी चारचाकी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपस पोलीस उपनिरीक्षक बनकर करीत आहेत.