चेंबूर, मुंबई येथून कोळकीत आलेल्या ५४ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now




स्थैर्य, फलटण, दि. ३ : चेंबूर, मुंबई येथून कोळकी ता. फलटण येथे कुटुंबासमवेत आलेल्या ५४ वर्षीय पुरुषाची लक्षणे असल्याने दि ०१ जून २०२० रोजी घेण्यात आलेल्या स्वॅबचा अहवाल काल (दि. २ जून) रोजी रात्री उशिरा पाॅसिटीव्ह आलेला आहे. सदर व्यक्तीचा जिल्हा रुग्णालय सातारा येथे दिनांक ०२ जून २०२० रोजी मृत्यू झालेला आहे. काल (दि. २ जून) अखेर करोना बाधित असलेले एकूण १० रुग्ण फलटण तालुक्यात आहेत. त्या सोबत तालुक्यात ह्या पूर्वी एकूण ९ रुग्ण करोना पासून बरे झाले असून तालुक्यात ४ जणांचा करोना मुळे मृत्यू झाला असल्याची माहिती फलटण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!