पनवेलमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये २५ वर्षीय तरुणीचा विनयभंग


स्थैर्य, पनवेल, दि. १७ : पनवेलमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका २५ वर्षीय तरुणीवर क्वारंटाईन असलेल्याच एका २५ वर्षीय युवकाने लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या महामारीवर मात करण्यासाठी लढत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. यानुसारच पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील कोरोना संशयितांना किंवा हाय रिस्क लोकांना क्वारंटाईनची व्यवस्था कोण गाव येथील इंडिया बुल्स येथे करण्यात आली आहे. या इमारतीतच हा धक्कादायक प्रकार समोर आला.

संबधित प्रकार गुरूवारी मध्यरात्री घडल्याचा खुलासा सूत्रांकडून सांगण्यात येत असून क्वारंटाईन सेंटमध्येच कोरोना संभाव्य म्हणून दाखल झालेल्या एका तरुणीचा एका विकृत तरुणाने विचित्र पद्धतीने विनयभंग केल्याची माहिती पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. पीडित मुलगी आणि मुलगा एकाच परिसरात राहत असून मुलाने तिचा विनयभंग करून तिच्या गुप्तांगात बोटे घातल्याचा आरोप तिने केला आहे. पोलिसांनाी याबाबत तत्काळ कारवाई करत भा. दं. वि. कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस अधिक तपास करीत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!