
स्थैर्य, फलटण, दि. ०९ सप्टेंबर : नीरा खोऱ्यातील प्रमुख धरणांमध्ये आज (दि. ९) सकाळी ९९.८२ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती नीरा उजवा कालवा विभागातर्फे देण्यात आली आहे. भाटघर, नीरा देवघर आणि गुंजवणी ही धरणे १०० टक्के क्षमतेने भरलेली असून, वीर धरणातील पाणीसाठा किंचित कमी होऊन ९९.४७ टक्क्यांवर आला आहे.
नीरा प्रणालीतील चारही धरणांची एकूण क्षमता ४८.३३ टी.एम.सी. असून, आजमितीस त्यामध्ये ४८.२४ टी.एम.सी. पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी हा साठा ४८.३० टी.एम.सी. होता. धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक सुरू असल्याने तीन धरणांमधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे.
धरणांमधील आजची स्थिती:
- भाटघर: २३.५० टी.एम.सी. (१००%) – नीरा नदीत १,६२४ क्युसेक्स विसर्ग सुरू.
- वीर: ९.३० टी.एम.सी. (९९.४७%) – नदीतील विसर्ग बंद, कालव्यात २,४०० क्युसेक्स विसर्ग सुरू.
- नीरा देवघर: ११.७२ टी.एम.सी. (१००%) – एकूण १,९२८ क्युसेक्स विसर्ग सुरू.
- गुंजवणी: ३.६९ टी.एम.सी. (१००%) – नदीत २५० क्युसेक्स विसर्ग सुरू.
एकूण पाणीसाठा समाधानकारक असला तरी, नदीपात्रात पाणी सोडले जात असल्याने नदीकाठच्या गावांना देण्यात आलेला सतर्कतेचा इशारा कायम आहे.