
स्थैर्य, फलटण : कु. तनिष्का सुरेश नाळे हिने इयत्ता दहावीच्या सिबीएससी बोर्ड परीक्षेत ९७.६० % गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. कु. तनिष्काने श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल, जाधववाडी, ता. फलटण या शाळेत इयत्ता दहावी मध्ये सिबीएससी बोर्ड परीक्षेत ९७.६०% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने यश संपादन केले. तनिष्काचे वडील सुरेश नाळे व आई सौ. उज्वला नाळे प्राथमिक शिक्षक असून तिला हे यश संपादन करण्यासाठी तिचे आई, वडील व प्राचार्या सौ. मीनल दीक्षित, अंजुम शेख, जीलानी आतार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
कु. तनिष्काच्या यशाबद्दल विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्या सौ. भावना सोनवलकर, फलटण पंचायत समिती कोळकी गणाचे सदस्य सचिन रणवरे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.