95 वर्षांच्या आनंदीबाई जाधव यांनी केली कोरोनावर मात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण दि.०५: पवारवाडी (ता.फलटण) येथील तिरंगा फाऊंडेशन संचलित डॉ.बुधाजीराव मुळीक कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेवून मठाचीवाडी (ता.फलटण) येथील 95 वर्षीय आनंदीबाई जाधव या वयोवृद्ध महिलेने कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

आनंदीबाई जाधव या 95 वर्षीय आज्जींचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचा एचआरसीटीचा स्कोर 17 होता. मात्र कोणत्याही हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचार मिळत नव्हते. अशात त्यांना तिरंगा फाऊंडेशन संचलित कृषी तज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक कोरोना केअर सेंटरची माहिती मिळाली व त्यांना तेथे दाखल करण्यात आले. या ठिकाणचे डॉ. अमोल चांदगुडे, डॉ. रोहित शिंदे, डॉ. बाळासाहेब माने, डॉ. गणेश निकम, परिचारिका व इतर कर्मचार्‍यांनी केलेल्या उपचारामुळे आज्जी लवकर बर्‍या झाल्या.

कोरोना बाधित रुग्णांना बरे करण्यासाठी तिरंगा फाउंडेशनचे अध्यक्ष रणजित शिंदे व त्यांचे सहकारी वेगवेगळे उपक्रम राबवून जसे की भजन, व्याख्याने योगा आयुर्वेदिक काढा भारुडे किर्तन या माध्यमातून रुग्णांची मनोरंजन व धीर देण्याचे काम करत आहेत. फलटण तालुक्यातून त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.


Back to top button
Don`t copy text!