दैनिक स्थैर्य | दि. २ जून २०२३ | फलटण | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेस फलटण तालुक्यातील ७७ परीक्षा केंद्रावर ४१५५ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ३९३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले म्हणजे तालुक्याचा निकाल ९४.७० % लागला. उत्तीर्णांमध्ये १०६८ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात, १५१२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १०७३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि २८२ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.
७७ विद्यालयांपैकी २१ विद्यालयाचा निकाल १०० % लागला असून त्यामध्ये श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कुल, फलटण, मठाचीवाडी विद्यालय मठाचीवाडी, न्यू इंग्लिश स्कुल, पाडेगाव, संत ज्ञानेश्वर विद्यालय, नांदल, सरलष्कर बाबाराजे खर्डेकर विद्यालय, हणमंतवाडी, ज्योतिर्लिंग माध्यमिक विद्यालय, पवारवाडी, श्रीराम खोलेश्वर माध्यमिक विद्यालय, मुंजवडी, कमला निंबकर बालभवन, फलटण, चौधरवाडी हायस्कुल, चौधरवाडी, शरद प्रतिभा माध्यमिक विद्यालय, शिंदेवाडी, वडले माध्यमिक विद्यालय, वडले, निरगुडी हायस्कुल, निरगुडी, दूधेश्वर माध्यमिक विद्यालय, दुधेबावी, माध्यमिक विद्यालय, साठे, अम्बिशन इंग्लिश मिडीयम स्कुल आदर्की बु., ब्रिलियंट ऍकेडमी इंग्लिश मिडीयम स्कुल, फलटण, बी. जे. इंग्लिश मिडीयम स्कुल, खामगाव, नियोजित उच्च माध्यमिक विद्यालय, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट, कोळकी, राष्ट्रबंधू राजीव दीक्षित गुरुकुल, पिंप्रद, हाजी अब्दुल रज्जा उर्दू हायस्कुल, फलटण या २१ विद्यालयाचा समावेश आहे.