९० टक्के नवीन माता थकलेल्या व अस्थिर : बेड्डी-मॉम्सप्रेसो सर्वेक्षण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०६ मे २०२२ । मुंबई । प्रौढ व्यक्तींना रात्री आठ तासांची पुरेशी झोप मिळणे आवश्‍यक आहे. पण बाळाच्या संगोपनासह विशेषत: नवीन मातांची झोपमोड होते, ज्यामुळे त्यांना थकवा, अस्थिरपणा व नैराश्याचा त्रास होत असल्याचे बेड्डी-मॉम्सप्रेसोद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. सेन्चुरीचा बेबी मॅट्रेसेससाठी ब्रॅण्ड बेड्डीने नवजात बाळांच्या मातांचे मिळणा-या झोपेबाबत माहिती करून घेण्यासाठी मॉम्सप्रेसोसोबत सहयोगाने सर्वेक्षण केले. दिल्ली, मुंबई, बेंगळुरू व हैदराबाद या चार प्रमुख शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले.

सर्वेक्षणाच्या मते ९० टक्के मातांनी सांगितले की, त्यांना दिवसाच्या शेवटी थकल्यासारखे व अस्थिर वाटते. ८५ टक्के मातांना वाटते की त्यांना अधिक तास झोपेची गरज आहे आणि ७५ टक्के मातांनी सांगितले की त्या त्यांच्या दैनंदिन कामांचे व्यवस्थापन करू शकत नाहीत.

सर्वेक्षणाने निदर्शनास आणले की, ५३ टक्के मातांनी त्यांच्या झोपमोडीसाठी त्यांच्या नवजात बाळांसोबत बेड शेअर करण्याचे अव्वल कारण सांगितले. ७६ टक्के मातांनी बेड शेअर करण्याचे अव्वल कारण सांगितले की, त्यामुळे त्यांना त्याचे मूल सुरक्षित असल्याची खात्री मिळते, जे द अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडिएट्रिक्स आणि कॅनेडियन पेडिएट्रिक सोसायटी यांसारख्या संस्थांमधील आघाडीच्या डॉक्टरांनी सांगितलेल्या मार्गदर्शकतत्त्वांच्या विरोधात आहे. ही मार्गदर्शकतत्त्वे सांगतात की बाळ मॅट्रेस, वेगळी गादी, पालकांच्या खोलीमध्येच बाजूला अत्यंत सुरक्षित असते. म्हणूनच क्रँकी मॉम्स मोहिमेचा मातांना पुरेशी झोप मिळण्यामध्ये आणि बाळांना पाठीला सर्वोत्तम आधार व संगोपन मिळण्यामध्ये मदत करण्यासाठी वेगळे बेबी बेड व मॅट्रेसच्या गरजेला प्रकाशझोतात आणण्याचा मनसुबा आहे.

९० टक्के मातांनी मान्य केले की, बाळ ५० ते ७० टक्के वेळ झोपत असल्यामुळे मॅट्रेस पाठीला सर्वोत्तम आधार व संगोपनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. बहुतेक मातांना वाटले की योग्य बेबी मॅट्रेस श्वास घेण्यास अनुकूल, तापमनावर नियंत्रण ठेवणारी, वॉटरप्रूफ असण्यासोबत नैसर्गिक साहित्यापासून बनवलेली असली पाहिजे. योगायोगाने ही सर्व वैशिष्ट्ये (आणि इतर अनेक) बेड्डी नेस्ट मॅट्रेसमध्ये आहेत.

सेन्चुरी मॅट्रेसच्या बेड्डीच्या सह-संस्थापक श्रीम. श्रुती मलानी म्हणाल्या, “यंदा मातृदिनानिमित्त आमची नवीन मातांमधील झोपमोड निदर्शनास आणण्याची इच्छा आहे. मॉम्सप्रेसोसोबत सहयोगाने आम्‍ही केलेले सर्वेक्षण निदर्शनास आणते की, नवीन मातांना अधिक मदतीची गरज आहे आणि झोपमोड झाल्याने त्या अस्थिर होतात. याच कारणामुळे आपल्यापैकी प्रत्येकाने वैयक्तिकदृष्ट्या किंवा व्यावसायिकदृष्ट्या योगदान दिले पाहिजे. ब्रॅण्ड म्हणून सेन्चुरी व बेड्डी आमच्या खासरित्या डिझाइन केलेल्या मॅट्रेसेसच्या माध्यमातून माता व बाळांना पुरेशी झोप व आरोग्यदायी जीवन देण्याची कटिबद्धता पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतात.”


Back to top button
Don`t copy text!