आपल्या मुलांच्या पोषणाच्या गरजा इतरांपेक्षा वेगळ्या असल्याचे ९० टक्के मातांचे मत: सर्व्हे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २२ ऑक्टोबर २०२१ | मुंबई | प्रत्येक मुलाची पोषणतत्वांची गरज आणि आरोग्याची उद्दिष्ट्ये ही वेगवेगळी असतात. आपल्या मुलाच्या पोषणतत्वांच्या गरजा इतरांपेक्षा वेगळ्या असल्याचे अगदी ९० टक्के मातांना वाटते. मातांच्या त्यांच्या मुलांच्या पोषणाबाबतच्या चिंता जाणून घेण्याच्या उद्देशाने भारतातील सर्वात मोठे माहितीपर मजकुराचे व्यासपीठ मॉम्सप्रेसो डॉटकॉमने वैयक्तिकृत हेल्थ ड्रिक ब्रँड ग्रिट्झोसोबत नुकतेच केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब निदर्शनास आली आहे. देशभरात हेल्थ फूड ड्रिंक्सचा वापर कशाप्रकारे केला जातो याबाबत या अध्ययनात सखोल माहिती देण्यात आली आहे. देशभरातील ५०० मातांदरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यांचे एक मूल किमान ४ वर्षांपेक्षा मोठे होते आणि त्या मुलांना पौष्टिक भोजन आणि हेल्थ ड्रिंक्सही देत होत्या.

मुलांना नेहमी चविष्ट खाद्यपदार्थ आवडतात, हे अगदी जागतिक सत्य आहे. यामुळे बहुतांश मातांना चवदारपणा आणि सकसता यांच्यात अचूक सुवर्णमध्य साधण्याची कसरत करावी लागते. बहुतांश मातांच्या मते दूध हे त्यांच्या मुलांसाठी संपूर्ण अन्न असून ते आरोग्यवर्धक आणि पुरेशी पौष्टिक तत्त्वे प्रदान करते. विशेषत: दुधात स्वादिष्ट फूड ड्रिंकचा वापर त्याच्या सकसपणात वाढच करतो.

बाजारात सध्या उपलब्ध असलेली हेल्थ फूड ड्रिंक्स आपल्या मुलाच्या विशिष्ट पौष्टिक गरजांची पूर्तता करत नाही, असे ७५ टक्के मातांना वाटते. यामुळे वैयक्तिकृत पोषणाच्या गरजेचे महत्त्व आणखीच अधोरेखित होते. आपल्या मुलांची विशिष्ट प्रकृती व पौष्टिक गरजांसाठी विशेषपणे तयार केलेले हेल्थ फूड ड्रिंक असावे, अशी ८५ टक्के मातांची मागणी असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. जेव्हा वैयक्तिक आवश्यकतांचा मुद्दा येतो तेव्हा मातांना मुलाची उंची, वजन, मेंदूची सक्रियता आणि ऊर्जा यांची सर्वाधिक काळजी असते. सर्व्हेनुसार, प्रामुख्याने उच्च उत्पन्न समूहातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त मातांना हेल्थ फूड ड्रिंक्सनी उपरोक्त चिंता दूर करावी अशी इच्छा आहे. शीर्ष मेट्रो शहरांत नोकरदार आई-वडिलांचे प्रमाण वेगाने वाढत चालले आहे. त्यांच्याकडे मर्यादित वेळ असल्यामुळे जेवणातून मुलांच्या पोषणाच्या गरजा भागवल्या जाव्यात, यावर पालकांचा मोठा भर आहे.

मॉम्सस्प्रेसोचे सहसंस्थापक श्री प्रशांत सिन्हा म्हणाले, “मातांना आपल्यासारख्याच इतर मातांसोबत आपल्या सामान्य चिंता आणि त्यांच्यावरील सर्वोत्तम समाधान काढण्याच्या उद्देशाने चर्चेसाठी मंच उपलब्ध करून देणे हे आमच्या मॉम्सस्प्रेसो डॉटकॉमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. मुलांच्या पोषणाच्या समस्यांची उकल करण्याच्या दिशने हा सर्व्हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. तसेच ग्रिट्झोसारख्या ब्रँड्सना त्यांच्या आश्वासक व सखोल संशोधनाअंती निर्मित उत्पादनांतील दरी भरून काढण्यासाठीही सर्व्हेची मदत झाली आहे.

ग्रिट्झोचे महाव्यवस्थापक (श्रेणी) श्री सुभादीप दासगुप्ता म्हणाले की, “मॉम्सप्रेसोच्या संशोधनात मातांच्या गरजा आणि प्राथमिकतांबाबत अत्यंत रोचक माहिती समोर आली आहे. सर्व्हेनुसार, ५ पैकी ३ मातांना त्यांच्याकडील सध्याचे हेल्थ फूड ड्रिंक आपल्या मुलाच्या मानसिक विकासाची गरज पूर्ण करत नसल्याचे वाटते. यामुळे लक्ष्याधारित बाल पोषणाची गरज असल्याच्या आमच्या भूमिकेला या चिंतांमधून आणखीच बळकटी मिळत आहे. वैयक्तिकृत प्रोटीन आणि न्युट्रिशन ड्रिंक्सच्या माध्यमातून भारतीय मुलांच्या अद्वितीय पोषण गरजांची पूर्तता होऊ शकते आणि अचूक प्रमाणसूत्रांच्या (फॉर्म्युलेशन्स) माध्यमातून सध्याची दरी सांधता येऊ शकते.”


Back to top button
Don`t copy text!