सातारा- जावलीतील रस्ते विकासकामांसाठी 90 कोटी

ना. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; 8 कामांसाठी नाबार्डमधून निधी मंजूर


स्थैर्य, 8 जानेवारी, सातारा : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील रस्ते विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध होत असून अनेक विकासकामे मार्गी लागत आहेत. ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्यातून आता सातारा- जावली तालुक्यातील रस्ते विकासाच्या विविध 8 कामांसाठी तब्बल 90 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.

ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी सुचवलेल्या कामना शासनाच्या नाबार्ड योजनेतून हा निधी मंजूर झाला आहे. जावली तालुक्यातील वारणेवस्ती, गाढवली, कुरळोशी, केळघर, डांगरेघर, आखेगणी, धावली, मेमाणेवस्ती, सुलेवाडी, सायघर रस्ता भाग केळघर ते धावली या अतिवृष्टीने क्षतिग्रस्त झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 18 कोटी 90 लाख रुपये, सर्जापूर ते कळंबे रस्त्यावरील पुलाचे जोड रस्त्यासह बांधकाम करण्यासाठी 6 कोटी, प्रजिमा 25 कुडाळ ते पानस रस्ता ग्रा.मा. 89 मध्ये कुडाळी नदीवर मोठ्या पुलाचे जोडरस्त्यासह बांधकाम करण्यासाठी 5 कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे.

सातारा तालुक्यातील लिंबखिंड- खिंडवाडी रस्ता प्रजिमा 30 मध्ये वर्ये गावाजवळ वेण्णा नदीवर पोहोच मार्गासह मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी 23 कोटी 50 लाख रुपये, राज्य महामार्ग 4 ते म्हसवे, करंजे, मोळाचा ओढा शाहूपुरी पोलीस ठाणे मतकर कॉलनी, शाहूपुरी चौक, ते जुना मेढा रस्ता ते सारखळ रस्त्यावर म्हसवे गावाजवळ वेण्णा नदीवर मोठ्या पुलाचे पोहोच मार्गासह बांधकाम करण्यासाठी 18 कोटी, रा.म. 4 ते माजगाव, अंबेवाडी जोडरस्त्यावर माजगाव गावाजवळ उरमोडी नदीवर पोहोच मार्गासह मोठ्या पुलाचे बांधकाम करणे 8 कोटी, खालची जगमीन, वरची जगमीन रस्ता ग्रा.,मा. 124 मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणेसाठी 5 कोटी, पांगारे,पळसावडे, सांडवली, इ.जि.मा. 61 (केळवली) रस्ता ग्रा.मा. 123 येथे काँक्रीट रस्त्याचे बांधकाम व पुलाचे बांधकाम करणेसाठी 5 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. मंजूर कामांची निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करा. कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा, अशा सूचना ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकार्‍यांना केल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!