स्थैर्य मुंबई दि. 14 . मुंबई ठाणे शिधावाटप यंत्रणेअंतर्गत शिधावाटप कार्यालय ६ – अ, सी. पी. टँक (चंदनवाडी) येथे दक्षता पथकामार्फत 9 लाख 42 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व नागरी पुरवठा मुंबईचे संचालक कैलास पगारे यांनी दिली.
लॉकडाऊनच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत दिनांक 11 जुलै .2020 रोजी दक्षता पथकाकडून शिधावाटप कार्यालय ६ – अ, सी. पी. टँक (चंदनवाडी) येथे अधिकृत शिधावाटप दुकान क्र.6-अ-43 येथे टेम्पो क्र.एम.एच.-48-बी.एम.-5474 मध्ये तांदूळ 2150 कि.ग्रॅ. व गहू 2600 कि.ग्रॅ., चा साठा जप्त करण्यात आला. या गुन्ह्यामध्ये 9 लाख 42 हजार 400 रूपये इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे, मुंबई येथे गुन्हा नोंद क्र.13/2020 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.