स्थैर्य, फलटण, दि. २३ : सस्तेवाडी, ता. फलटण येथील रहिवाशी असलेल्या परंतू मुबईतुन विना परवाना गावाकडे आलेल्या कुटुंबातील पती-पत्नी करोना पॉझीटीव्ह असल्याचा अहवाल काल दि. २१ रोजी प्राप्त झाले होते. विना परवाना मुंबई येथून गावात दाखल झालेल्या या कुटुंबाला शेती शाळा, फलटण येथील विलगीकरण कक्षात ३ दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते, त्यापैकी पती-पत्नीस इतर आजार असल्याच्या संशयावरुन घशातील स्रावाचा नमुना घेण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे पाठविण्यात आले होते, त्यांचा अहवाल पॉसिटीव्ह आल्या नंतर सदरील दांपत्याच्या ९ हाय रिस्क तर २३ लो रिस्क कॉन्टॅक्ट मध्ये असलेल्यांची यादी तयार करण्यात आली आहे, अशी माहिती फलटण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिली.
काल दिनांक २२ मे पर्यंत 3111 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत व त्यांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला नाही. तर विलगीकरण कक्षामध्ये 22 व संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये 36 व्यक्ती आहेत. अजून ६ जणांच्या स्रावाचे अहवाल येणे बाकी असल्याचेही, फलटण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी स्पष्ट केले.