9 जणांना 10 दिवसानंतर डिस्चार्ज ; वाई तालुक्यातील वेळे येथील बाधित रुग्णाचा मृत्यु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 2 मृत्यु झालेल्यांसह 145 जणांचे नमुने तपासणीला तर 42 जणांचे नमुने निगेटिव्ह 

स्थैर्य, सातारा दि. 16 : विविध रुग्णालयांमध्ये तसेच विविध कोरोना केंअर सेंटरमध्ये दाखल असणाऱ्या 29 जणांचा आज 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच वाई तालुक्यातील वेळे येथील 50 वर्षीय कोविड बाधिताचा मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

यामध्ये खटाव येथील 57 वर्षीय पुरुष, चिंचणी येथील 3 पुरुष व 2 महिला सातारा तालुक्यातील खडगुण येथील 64 वर्षीय पुरुष, वावदरे येथील 41 वर्षीय पुरुष, कारंडी येथील 25 वर्षीय महिला, जरंडेश्वर नाका, सातारा येथील 23 वर्षीय महिला महाबळेश्वर तालुक्यातील गोरोशी (बिरवडी) 43 वर्षीय पुरुष, जावली तालुक्यातील तोरणेवाडी येथील 47 वर्षीय पुरुष, काटवली येथील 61 वर्षीय पुरुष फलटण तालुक्यातील साखरवाडी येथील 36 वर्षीय पुरुष, वडले येथील 54 वर्षीय व 35 वर्षीय पुरुष, होळ येथील 58, 56 व 64 वर्षीय पुरुष, 62, 51 व 45 वर्षीय महिला, तांबवे 45 व 60 वर्षीय महिला, 6 व 3 वर्षीय बालके, 65 व 26 वर्षीय पुरुष माण तालुक्यातील दहिवडी येथील 19 वर्षीय युवक यांचा समावेश आहे.

145 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 20, कृष्णा मेडिकल, कॉलेज, कराड येथील 37, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 13, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 3, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 8, वाई 12, शिरवळ येथील 18, रायगाव येथील 3, पानमळेवाडी येथील 14, मायणी 11, महाबळेश्वर 4, पाटण 2 असे एकूण 145 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणी करिता पाठविण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई येथून प्रवास करुन आलेले पाटण तालुक्यातील गोवारी येथील 50 वर्षीय पुरुष व हावलेवाडी येथील  45 वर्षीय महिला यांचा मृत्यु झाला असून त्यांचा मृत्यु पश्चात कोविड संशियत म्हणून नमुना तपासणीकरीता पाठविण्यात आला आहे.

वेळे येथील बाधिताचा मृत्यु


क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे वेळे ता. वाई येथील 50 वर्षीय कोविड बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार चालू होते.

42 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 42 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!