रिलायन्सचे शेअर्स 8.62 टक्क्यांनी घसरले; मुकेश अंबानींची संपत्ती 52 हजार कोटी रुपयांनी घटली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य,मुंबई, दि ३: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींचे नेटवर्थ एका झटक्यात ५२,००० कोटी रुपयांनी घटले. तिमाही नफ्यातील घसरणीनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये गेल्या तीन महिन्यांत सर्वात मोठी घसरण आल्याने ही स्थिती ओढवली. सोमवारी कंपनीचे शेअर्स ८.६२% ने गडगडले. ते १७७ रुपयांनी घसरून १८७७ रुपयांवर बंद झाला. यामुळे अंबानींची एकूण संपत्ती सुमारे ५.२५ लाख कोटी रुपये (७१०० कोटी डॉलर) राहिली आहे. ब्लूमबर्ग बिलिनेअर इंडेक्सनुसार, हा मार्चनंतर त्यांचा सर्वात वाईट दिवस राहिला. शुक्रवारी रिलायन्सने तिमाही निकाल जाहीर केले. यात १५% घटीसह ९,५७० कोटींचा नफा दाखवला. कोरोनामुळे इंधनाची मागणी घटल्याने महसूल २४% घटून १.१६ लाख कोटी रु. राहिला. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स समूह ऑइल व पेट्रोकेमिकल क्षेत्रातील दिग्गज कंपनी झाल्यानंतर स्वत:ला तंत्रज्ञान आणि डिजिटल सेवांकडे वळवत आहे. ब्लूमबर्ग बिलिनेअर इंडेक्सनुसार, रिलायन्सच्या शेअर्समध्ये या वर्षी जवळपास २९% ची तेजी दिसली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!