दैनिक स्थैर्य । दि.१९ जानेवारी २०२२ । दहिवडी । दहिवडी नगरपंचायतीच्या तीन जागांसाठी दहा उमेदवार रिंगणात असून आज दहिवडीमध्ये शांततेत मतदान पार पडले. प्रचंड प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. एकूण 2045 मतदारांपैकी1875 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.एकूण 85 टक्के मतदान झाले.
चार मतदान केंद्रांवर मतदान पार पडले.पहिल्या दोन तासात 10 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर मतदानाचा वेग चांगलाच वाढला.साडेअकरा वाजता 36 टक्के मतदान पूर्ण झाले होते. दुपारच्या सत्रात अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केली. दीड वाजेपर्यंत 60 टक्के मतदान झाले होते. दुपारी दीड ते साडेतीन या सत्रात मतदानाचा टक्का वाढला. 75 टक्के मतदान झाले होते. शेवटच्या दोन तासात फक्त 10 टक्के मतदान झाले. 2045 पैकी 1875 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 85 टक्के मतदान वाढले. प्रभाग एक मधील निवडणूक या अगोदरच बिनविरोध झाली असून त्या ठिकाणी
शिवसेनेच्या सुरेखा पखाले विजयी झाल्या आहेत.
प्रभाग सहा मध्ये विक्रमी 89 टक्के मतदान झाले. प्रभाग सहा मध्ये माजी नगराध्यक्ष धनाजी जाधव, नगरसेविका सानिया शेख यांचे सुपुत्र सोहेल शेख व प्रकाश जाधव यांच्यात तिरंगी रस्सीखेच झाली. आर्थिक दृष्ट्या मोठी उलाढाल या प्रभागात झाली असल्याची चर्चा जोरात रंगली आहे. कोट्यवधी रुपयांचा चुराडा या प्रभागात झाला असल्याने ही लढत हा व्होल्टेज ड्रामा ठरणार आहे. उद्या दि. 19 रोजी सकाळी 10 वाजता शासकीय गोदामात होणार आहे.