स्थैर्य, सातारा दि.१०: जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 59 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित तर 2 बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 1, शुक्रवार पेठ 1, सदर बझार 3, तामजाईनगर 1, शाहूपुरी 1,कन्हेरी 1, नागठाणे 1.
कराड तालुक्यातील मलकापूर 2, ढेबेवाडी 1, बनवडी 1,गोवारे 1, हेळगाव 1.
फलटण तालुक्यातील रविवार पेठ 1, तोंडले 1, डोंबाळेवाडी 2, खराडे 1.
खटाव तालुक्यातील खटाव 1, बुध 1, पळसगाव 1, नेर 2, ललगुण 1, वर्धनगड 1,जांब 1,पुसेसावळी 1, ललगुण 1.
माण तालुक्यातील मलवडी 2,म्हसवड 1, पिंपरी 1.
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, रहिमतपूर 3.
खंडाळा तालुक्यातील लोणंद 2, मोरवे 1, पळशी 1,शिरवळ 3, नायगाव 1.
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 3.
पाटण तालुक्यातील पाटण 1.
वाई तालुक्यातील कडेगाव 1.
जावली तालुक्यातील मेढा 2.
इतर 2
इतर जिल्हे सांताक्रुझ (मुंबई) 1, मिरज 2.
2 बाधितांचा मृत्यु
जिल्हा रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये नरवणे ता. माण येथील 70 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्यांमध्ये महाबळेश्वर येथील 56 वर्षीय पुरुष अशा 2 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
एकूण नमुने – 294684
एकूण बाधित -55211
घरी सोडण्यात आलेले – 52572
मृत्यू -1801
उपचारार्थ रुग्ण-838