सहा नगरपंचायंती साठी जिल्ह्यात 80.49 टक्के मतदान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.१९ जानेवारी २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीसाठी मंगळवारी 80.49 टकके मतदान झाले. लोणद कोरेगाव पाटण वडूज खंडाळा दहिवडी या सहा नगरपंचायतीच्या 13818 मतदारांनी निवडणुकीच्या रिंगणातील 82 उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद केले. या निवडणुकांचा निकाल बुधवारी, दि. 19 रोजी लागणार असल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आहे.

ओबीसी आरक्षणाचा घटनात्मक पेच निर्माण झाल्याने राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिल्याने सातारा जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या 23 जागांसाठी मंगळवारी सकाळी आठ ते साडेपाच या दरम्यान अत्यंत शांततापूर्ण वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडली. जिल्ह्यात एकूण31 बूथवर निवडणूक प्रक्रिया पार पडली. लोणंद कोरेगाव पाटण वडूज खंडाळा येथील प्रत्येकी चार व दहिवडी नगरपंचायती च्या तीन अशा तेवीस इतर मागास प्रवर्गाच्या जागांसाठी एकूण 82 उमेदवार रिंगणात होते. नोंदणीकृत 17168 मतदारांपैकी 13818 उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला. लोणंदमध्ये सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 79.25 कोरेगाव मध्ये 79.79 पाटण मध्ये 76.48 वडूज मध्ये80.86 खंडाळा येथे 84.89 तर दहिवडी नगरपंचायतीसाठी सर्वाधिक 85.03 टक्के मतदान झाले. जिल्ह्यात दिवसभर सहा नगरपंचायतीसाठी सरासरी 80.49 टकके मतदान झाल्याची माहिती निवडणूक शाखेतून देण्यात आली.

राज्यात महाविकास आघाडी असली तरी शिवसेना भाजप व राष्ट्रवादी या तीन राजकीय पक्षात जोरदार रस्सीखेच स्थानिक पातळीवर दिसून आली . कोरेगाव मध्ये आमदार शशिकांत शिंदे विरुद्ध आमदार महेश शिंदे असा हाय व्होल्टेज ड्रामा रंगला त्यामुळे सर्वच निकालांची राजकीय वर्तुळात उत्सुकता ताणली गेली आहे . जिल्हा प्रशासनाने 31 बूथवर 615 कर्मचारी यांची नियुक्ती केली असून नगरपंचायत कार्यक्षेत्रात मतमोजणी केली जाणार असून एक केंद्राध्यक्ष ‘ चार मतमोजणी अधिकारी तसेच सहाय्यक कक्ष अधिकारी यांच्या नेमणुका निश्चित झाल्या असून दुपारी बारा वाजेपर्यंत निकाल येणे अपेक्षित आहेत.


Back to top button
Don`t copy text!