फलटण तालुक्यात ८ गट तर १६ गण; प्रारूप गट व गण रचना प्रसिद्ध; वाचा सविस्तर…

हरकती अथवा सूचना २१ जुलै पर्यंत सादर कराव्यात


दैनिक स्थैर्य । 14 जुलै 2025 । फलटण । निवडणूक २०२५ अनुषंगाने महाराष्ट्र शासनाकडील आदेश क्र जिपनि-२०२५/प्र.क्र.३६/पं.रा-२ दि १२/६/२०२५ अन्वये प्रभागाच्या भौगोलीक सिमा निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सदर आदेशात दिलेल्या सुचनेनुसार सातारा जिल्हा परिषद व ११ पंचायत समितीची प्रारुप प्रभागरचना आज दि १४ जुलै २०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी फलटण तालुक्यात एकूण ८ गट व पंचायत समितीसाठी १६ गण असणार आहेत.

तरी सदर प्रभागरचनेच्या मसुदयास आपल्या काही हरकत किंवा सुचना असल्यास त्यासंबंधीची सकारण लेखी निवेदने/हरकती/सुचना संबंधीत तहसिलदार यांचेकडे दि. २१ जुलै २०२५ पर्यंत सादर करावेत.

– असे आहेत, फलटण तालुक्यात गट व गण –


Back to top button
Don`t copy text!