दैनिक स्थैर्य | दि. १७ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन व ७७ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्रीमंत मुधोजीराजे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे व्हाईस चेअरमन श्री. रमणलाल दोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी ध्वजारोहण ऑर्डर श्री. खुरंगे बी. बी. यांनी दिली तर राष्ट्रगीत गायन सौ. लोणकर मॅडम व विद्यार्थीनींनी सादर केले. तसेच श्री. पवार डी. जे. यांच्या मार्गदर्शनाखाली एन. सी. सी. च्या कॅडेटनी यावेळी शपथ घेतली. तसेच १० वीच्या विद्यार्थ्यांचा व १२ वीच्या कला, वाणिज्य व विज्ञान व किमान कौशल्य शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करून सत्कार करण्यात आले.
यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीच्य गव्हर्निंग कौन्सिलचे ट्रेझरर श्री. हेमंत रानडे, फलटण सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य श्री. शिरीषशेठ दोशी, श्री. पार्श्वनाथ राजवैध, श्री. भोजराज नाईक निंबाळकर , श्री. संजय भोसले, श्री. शिवाजीराव घोरपडे , सौ. वसुंधरा नाईक निंबाळकर, श्री. चंद्रकांत पाटील, प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम, अधिक्षक श्री. श्रीकांत फडतरे, शाळा तपासणीस श्री. दिलीप राजगुडा, प्राचार्य बाबासाहेब गंगवणे, उपप्राचार्य आण्णासाहेब ननवरे, पर्यवेक्षक व्ही. जे. शिंदे, गोपाळ जाधव, सौ. एम. बगाडे व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, पालक व इतर मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन रूपचंद बोबडे, सुजित जमदाडे व संदीप पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार सचिन धुमाळ यांनी मानले.