
दैनिक स्थैर्य | दि. २४ ऑगस्ट २०२३ | सातारा |
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ७३ वी वार्षिक साधारण सभा शुक्रवार, दि. २५ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १.०० वाजता बँकेचे मुख्य कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत येथील यशवंतराव चव्हाण सभागृहांत होणार आहे.
जिल्हयाच्या कृषी व ग्रामीण विकासाची प्रमुख अर्थवाहिनी असणार्या या बँकेला नाबार्ड, महाराष्ट्र शासन, नॅफस्कॉब, राज्य बँक, महारास्ट्र स्टेट को. ऑप बँक्स असोसिएशन तसेच देशातील इतर सहकारी संस्थांकडून विविध १०४ पुरस्काराने गौरविणेत आले आहे.
सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात बँकेला उच्चांकी करपूर्व ढोबळ नफा २०५ कोटी १० लाख लाख तर सर्व तरतूदीनंतर निव्वळ नफा रु. ७८ कोटी इतका झालेला आहे. बँकेबद्दल जनतेमध्ये असलेली प्रचंड विश्वासाहर्ता व बँकेची उत्कृष्ठ कार्यप्रणाली यामुळे बँकेच्या ठेवींत भरघोस वाढ झाली असून बँकेने मार्च २०२३ अखेर रु. ९८९१ कोटी इतक्या ठेवींची मजल गाठली आहे. बँकेची कर्जवसुली विक्रमी असून निव्वळ एन .पी .ए चे प्रमाण ’शून्य’ टक्के आहे. गोरगरीब शेतकरी, सर्वसामान्य यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कृषी ग्रामीण विकासाच्या अनेक नवनवीन योजना बँकेने राबविल्या असून जिल्हयाच्या सर्वांगीण विकासात बँकेचे मोलाचे योगदान आहे. अहवाल सालात झालेल्या नफ्यातून बँकेने कर्जदार शेतकरी सभासद, विकास सेवा सोसायटया, सचिव, इत्यादिसाठी भरीव तरतूद केलेली आहे. सातारा जिल्हा बँक, बँकींग कामकाजाबरोबर विकासाभिमुख कार्यात नेहमीच अग्रेसर असते. बँकेने महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये ज्या-ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती आली आहे, त्या-त्या वेळी आर्थिक मदत केली आहे.
बँकेची ऑडीट ‘अ’ वर्गाची परंपरा कायम राखली आहे. गुणवत्ता व आधुनिक बँकिंगद्वारे ग्राहकाभिमूख सेवा यामुळे बँकेस आय .एस .ओ. ९००१:२०१५ मानांकन प्राप्त झाले आहे. राज्यातच नव्हे तर देशपातळीवर नामांकित अशी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा लौकिक सर्वत्र झाला आहे .
अशा लौकिक प्राप्त बँकेच्या ७३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस बँकेच्या सर्व सभासदांनी शुक्रवार, दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १.०० वाजता बँकेचे मुख्य कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत येथील यशवंतराव चव्हाण सभागृहांत उपस्थित रहावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष, मा. श्री. नितिन जाधव पाटील, उपाध्यक्ष मा. श्री. अनिल देसाई व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले आहे .