738 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 960 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


 

स्थैर्य, सातारा दि.9: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 738 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 960 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

960 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 25,उपजिल्हा रुग्णालय कराड 21, उपजिल्हा रुग्णालय फलटण 77, कोरेगाव 52, वाई 106, खंडाळा 102, रायगांव 107, पानमळेवाडी 159, मायणी 61, महाबळेश्वर 42, दहिवडी 40 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 168 असे एकूण 960 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने –52671

एकूण बाधित — 20530 

घरी सोडण्यात आलेले — 12189 

मृत्यू — 557

उपचारार्थ रुग्ण –7784


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!