
दैनिक स्थैर्य । 15 जुलै 2025 । सातारा। कोयना धरणातून उद्या सकाळी 11 वाजता सहा वक्र दरवाजे प्रत्येकी 1 फूट 6 इंच उघडण्यात येणार आहेत. त्याद्वारे 5,000 क्युसेक विसर्ग केला जाणार आहे. तसेच पायथा विद्तगृहातून 2100 क्युसक विस्रग पूर्वीच सुरु आहे. त्यामुळे उद्यापासून 7100 क्युसेक पाणी नादीपात्रात सोडण्यात येणार आहे.नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. यामुळे धरणाचा साठा गेट लेव्हल (73.50 टीएमसी) गाठून आता क्रश लेव्हल ओलांडली आहे. पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने नियोजित विसर्गाचे आदेश दिले आहेत.
त्यामुळे धरणाच्या परिचालन यंत्रणेनुसार पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी उद्या सकाळी 11 वाजता सहा वक्र दरवाजे प्रत्येकी 1 फूट 6 इंच उघडण्यात येणार आहेत. त्याद्वारे 5,000 क्युसेक विसर्ग केला जाईल, अशी माहिती कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता महेश रासनकर यांनी दिली.
यासोबतच धरणाच्या पायथा विद्युतगृहातील दोन्ही युनिट्स कार्यरत असून, 2,100 क्युसेक विसर्ग आधीच सुरू आहे. त्यामुळे उद्यापासून एकूण 7,100 क्युसेक विसर्ग नदीपात्रात होणार आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि पोलिस युनिट्सना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या.