सस्तेवाडीत ७१ जनावरांची कत्तलीपासून सुटका; सुमारे सोळा लाखाचा मुद्देमाल हस्तगत; फलटण ग्रामीण पोलिसांची कारवाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ सप्टेंबर २०२१ । फलटण । फलटण तालुक्यातील सस्तेवाडी गावाच्या हद्दीमध्ये दि. १४ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बेकायदा बिगर परवाना कत्तल करण्यासाठी अंदाजे १० ते १५ पंधरा वर्षांच्या तीन गायी व सुमारे दोन ते पाच महिने वयाची ६८ खोंडे अशी एकूण ७१ जनावरे दाटीवाटीने डांबून ठेवलेली होती. सदर जनावरांच्या खाण्यापिण्याची कोणतीही सोय केली नव्हती. तसेच सदरची जनावरे बेकायदा बिगर परवाना कत्तलीसाठी नेण्यासाठी पिकअप गाडी सुद्धा या ठिकाणी आढळून आली म्हणून अर्षद जलील कुरेशी, कबीर मोहम्मद शेख दोघे रा. कुरेशी नगर, फलटण तर मौला अमिन शेख, रा. सरडे, ता. फलटण यांच्याविरूद्ध फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या बाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी कि, फलटण तालुक्यातील सस्तेवाडी गावाच्या हद्दीमध्ये दि. १४ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बेकायदा बिगर परवाना कत्तल करण्यासाठी अंदाजे १० ते १५ पंधरा वर्षांच्या तीन गायी व सुमारे दोन ते पाच महिने वयाची ६८ खोंडे अशी एकूण ७१ जनावरे दाटीवाटीने डांबून ठेवलेली होती. सदर जनावरांच्या खाण्यापिण्याची कोणतीही सोय केली नव्हती. तसेच सदरची जनावरे बेकायदा बिगर परवाना कत्तलीसाठी नेण्यासाठी पिकअप गाडी सुद्धा येथे आढळून आलेली आहे. एकूण सोळा लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल फलटण ग्रामीण पोलिसांनी हस्तगत केला असून याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सचिन पाटोळे यांनी दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार कर्णे करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!