फलटण तालुक्यात होणार विलीगीकरण कक्षाचे ७०० बेड्स : श्रीमंत संजीवराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. २२ : सध्या सातारा जिल्ह्यासह फलटण तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या हि मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यरत आहे. सध्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता व तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोना या आजारासाठी विलीगीकरण कक्ष सुरु करणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्या बाबतच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी काही दिवसांपूर्वी आवाहन केलेले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद गट निहाय लोकसहभातून विलीगीकरण कक्ष सुरु केले जात आहेत. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आमदार दीपक चव्हाण व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये नव्याने विलीगीकरण कक्ष सुरु करण्यात येत आहेत. तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये सुरु होत असलेल्या कोरोना केअर सेंटरच्या रूपाने तालुक्यातील नागरिकांना ७०० अतिरिक्त बेड्स हे उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

या बाबत अधिक माहिती देताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले कि, फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद गट निहाय विलीगीकरण कक्ष सुरु करण्याचे निर्देश विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिलेले होते. त्या नुसार प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये एक असे एकूण सात विलीगीकरण कक्ष सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्व विलीगीकरण कक्ष हे लोकसहभागातून साकारत असून येथे उपचार घेणाऱ्या नागरिकांना प्राथमिक वैद्यकीय सेवा ह्या मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जर कोरोना बाधित रुग्णाला जास्त प्रमाणात त्रास जाणवू लागला तर त्याला तातडीने येथून रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. ग्रामीण भागामध्ये सुरु होत असलेले विलीगीकरण कक्ष हे त्या गावातील स्थानिक डॉक्टरांच्या देखरेखीखाली असणार आहे. या सोबतच विलीगीकरण कक्षामध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना चहा, नास्ता व जेवण सुद्धा मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

फलटण – दहिवडी रोडवर असणाऱ्या झिरपवाडी गावच्या हद्दीत फुलाई गार्डन मंगल कार्यालय येथे १०० बेड्सचे कोरोना केअर सेंटर सुरु करण्यात आलेले आहे. साठे येथील लक्ष्मी नारायण लॉन्स येथे सुद्धा १०० बेड्सचे कोरोना केअर सेंटर सुरु करण्यात आलेले आहे. साखरवाडी येथे श्री दत्त इंडिया कारखान्याच्या माध्यमातून १०० बेड्सचे कोरोना केअर सेंटर कार्यरत आहे. चांदोबाचा लिंब, तरडगाव येथील हिंदवी लॉन्स मंगल कार्यालय येथे १०० बेड्सचा विलीगीकरण कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. पिंपरद येथील मंगल कार्यालयात १०० बेड्सचे कोरोना केअर सेंटर हे लोकसहभागातून सुरु होणार आहेत. ढवळ पाटी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून बाजार समितीच्या मंगल कार्यालयामध्ये १०० बेड्स सुरु करण्यात येणार आहेत. या बरोबरच जाधववाडी येथे शाशनाच्या माध्यमातून समाजकल्याण वसतीगृहामध्ये १०० बेड्सचे कोरोना केअर सेंटर कार्यरत आहे व तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद गट निहाय विलीगीकरण कक्ष स्थापन करण्यात येत आहेत, अशी माहिती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

जाधववाडी येथील सजाई गार्डन मंगल कार्यालय येथे सुद्धा १५० बेड्सचे कोरोना केअर सेंटर म्हणजेच विलीगीकरण कक्ष सुरु आहे. आगामी काळामध्ये जर गरज भासली तर सजाई गार्डन मंगल कार्यालय येथे अतिरिक्त बेड्स वाढवण्याबाबत आदेश सुद्धा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिलेले आहेत, असेही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी या वेळी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!