स्थैर्य, सातारा दि. 14 : सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयांमध्ये दाखल असणाऱ्या मुंबईहून प्रवास करुन आलेल्या 4 व बाधित रुग्णांचे निकटसहवासित असलेल्या 3 अशा एकूण 7 नागरिकांचे रिपोर्ट कोरोनाबाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्णांमध्ये सातारा तालुक्यातील गोजेगाव येथील 46 वर्षीय महिला व * क्षेत्रमाहूली येथील 50 वर्षीय पुरुष. कोरेगाव तालुक्यातील अनपटवाडी येथील 65 वर्षीय महिला. खटाव तालुक्यातील बोंबाळे येथील 60 वर्षीय महिला, खंडाळा तालुक्यातील झगलवाडी येथील 50 वर्षीय पुरुष माण तालुक्यातील दहिवडी येथील 60 वर्षीय पुरुष व किरकसाल येथील 49 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.