फलटणमध्ये करोनाच्या 7 रुग्णांची भर; एकुण रुग्णसंख्या 49 वर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. 12 : फलटण तालुक्यामधील वडले व बरड या गावातील पुर्वीच्या करोनाबाधीताच्या निकटच्या सहवासातील 7 जणांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे फलटण तालुक्यामध्ये करोनाच्या 7 नव्या रुग्णांची भर पडली आहे. फलटण तालुक्यात एकुण 49 रुग्णांना करोना झाला असुन त्यामधील चौघांचा करोनामुळे मृत्यु झाला आहे तर 14 जण हे करोना मुक्त झालेले आहेत. व आज अखेर फलटण तालुक्यामध्ये 31 करोनाबाधित रुग्ण आहेत, अशी माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली. 

काल (दि. 11 जुन) रोजी 2571 व्यक्ती गृह विलगीकरणामध्ये असुन त्यांचा 14 दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पुर्ण झालेला नाही. वडले येथील प्रथम पॉसिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कातील 10 जुन2020 रोजी घेण्यात आलेल्या 5 व्यक्तींच्या चाचण्या पॉसिटीव्ह आलेल्या आहेत. त्याच दिवशी बरड येथील करोनाबाधीताच्या निकटच्या सहवासातील व्यक्तिंच्या घेण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 1 पुरुष व 1 स्त्री असे 2 व्यक्ती पॉसिटीव्ह आले आहेत, असेही जगताप यांनी स्पष्ट केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!