स्थैर्य, सातारा, दि.३: आठवडाभरापासून भारतात जगातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त सापडत असताना अॅक्टिव्ह रुग्णसंख्येतही वेगाने वाढ होत आहे. २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबरपर्यंत अॅक्टिव्ह रुग्ण रोज १.५% च्या सरासरीने वाढून ७६,४३१ झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालये, होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत. गेल्या आठवड्यात ०.३९% दराने १९,०९२ अॅक्टिव्ह रुग्ण वाढले होते. या रुग्णांच्या वृद्धिदरात अचानक १.११% ची वाढ काळजीचे कारण आहे. अॅक्टिव्ह रुग्णांचा दर सलगपणे घटला तरच संसर्गाचा परिणाम कमी होईल.
महिनाभरात २.३२ लाख अॅक्टिव्ह रुग्णवाढ, रिकव्हरी रेट स्थिर
देशात ऑगस्टमध्ये २.३२ लाख रुग्ण वाढले. अमेरिका, ब्राझील व रशिया वगळता इतर देशांतील एकूण रुग्ण भारताच्या अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा कमी आहेत
> गेल्या आठवडाभरात देशात रुग्ण बरे होण्याचा वेग मंदावला आहे. २६ आॅगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान रिकव्हरी रेट १.१ टक्केच वाढला. तथापि, त्याआधीच्या आठवड्यात रिकव्हरी रेटमध्ये २.३ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती.
भारतात ९ हजार बाधित गंभीर, हा जगातील दुसरा मोठा आकडा
> भारतात ८,९४४ कोरोना रुग्ण गंभीर आहे. अमेरिकेत ही संख्या सर्वाधिक आहे.
> १ सप्टेंबरला अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सुमारे ०.३३ टक्के व्हेंटिलेटरवर होते. २.०१% रुग्णांना आयसीयूत आणि ३.३५% रुग्णांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले.
> ३० जानेवारीपासून १ सप्टेंबरपर्यंत एकूण १ लाख ४९ हजार ४८८ कोरोना रुग्ण ऑक्सिजन बेडवर भरती झाले. १ लाख १४ हजार २८१ आयसीयूत राहिले, तर ३३ हजार ४२९ बाधितांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते.
अॅक्टिव्ह रुग्णांचा रुग्णालयांवर परिणाम, सध्या अशी आहे स्थिती…
> कोविड रुग्णालये – १,६०७
९० केंद्र व १५१७ राज्यांची. ३.९१ लाख बेड्स आहेत. १.१६ लाख ऑक्सिजन सपोर्ट व ३२,४८१ आयसीयू बेड आहेत.
> कोविड हेल्थ सेंटर- ३,५४३
८५ केंद्र व ३,४५८ राज्यांची. ३.१३ लाख बेड्स. ७८ हजार ऑक्सिजन सपोर्ट आणि १९,३१६ आयसीयू बेड्स आहेत.
> कोविड केअर सेंटर-११,६९१
या सेंटर्समध्ये एकूण बेड्सची संख्या १० लाख ८४ हजार १८३ इतकी आहे.
कोरोना लसीसाठीच्या जागतिक प्रयत्नांत अमेरिका सहभागी नाही
> डब्ल्यूएचओसोबत कोरोना लस निर्मितीच्या जागतिक प्रयत्नांत अमेरिका सहभागी होणार नाही. व्हाइट हाऊसने ही घोषणा केली. डब्ल्यूएचओने चीनशी संगनमत करून कोरोना संबंधी माहिती लपवल्याचा आरोप अमेरिकेने केला होता.
> जगभरात ३६ लसी सध्या मानवी चाचण्यांच्या टप्प्यांत आल्या आहेत. दुसरीकडे प्री-क्लिनिकल ट्रायलअंतर्गत प्राण्यांवर ९० लसींची चाचणी सुरू आहे. यात काही प्रमुख भारतीय लसींचाही समावेश आहे.
> भारतात विकसित पहिली स्वदेशी लस को-व्हॅक्सिन सध्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. चाचणीचे प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर डॉ. ई. व्यंकट राव यांच्यानुसार, सुरुवातीच्या चाचण्यांत लसीचे साइड इफेक्ट्स आढळले नाहीत.