भादे येथे 68 हजारांचा ऐवज चोरीस


स्थैर्य, खंडाळा, दि.१२:  भादे, ता. खंडाळा येथे लघरातील खिडकीतून प्रवेश करीत अज्ञात चोरट्यांनी घरामधील सोन्याचे दागिने, दुचाकीसह रोख रक्कम असा 68 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, भादे ता.खंडाळा याठिकाणी  शामराव विठ्ठल पवार हे कुंटूंबियांसहित राहण्यास आहे. दरम्यान,मंगळवार दि.08 जून रोजी राञीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराच्या खिडकीतून दरवाजा उघडत घरामध्ये प्रवेश करुन प्लास्टिकच्या डब्ब्यातील 30 हजार रुपये किमतीचे 15 ग्रँम वजनाचे सोन्याचे मिनी गंठन, 12 हजार रुपये किंमतीचे 6 ग्रँम वजनाचे दोन कर्णफुले, 3 हजार रुपये किंमतीचा मोबाईल,20 हजार रुपये किंमतीची दुचाकी (क्रं.- एमएच-11-बीडब्ल्यू-9573) ,रोख रक्कम 3 हजार 500 रुपये असा 68 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

या घटनेमुळे भादेसह खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.  या घटनेची फिर्याद शामराव पवार यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे हे करीत आहे.


Back to top button
Don`t copy text!