सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी 6516 नागरिकांना परवानगी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सोलापूर दि. 27 : राज्याच्या इतर जिल्ह्यातून तसेच परराज्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी 393  नागरिकांना आज परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती  जिल्हा प्रशासनाकडून आज देण्यात आली. कालअखेर 6123 नागरिकांना परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यात येण्यासाठी 6516  नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे.

राज्याच्या इतर जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी आणि इतर जिल्ह्यात जाण्यासाठी तसेच परराज्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी आणि सोलापूर जिल्ह्यातून परराज्यात जाण्यासाठी covid19.mhpolice.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. या प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या अर्जानुसार परवानगी देण्यात येत आहे.

एक मे 2020 पासून covid19.mhpolice.in या वेबसाईट आजपर्यंत 93342 अर्ज प्राप्त  झाले असून 40302 जणांना परवानगी देण्यात आली आहे. 5466 अर्जांना परवानगी नाकारली असून 16174 अर्ज प्रलंबित आहेत. नाकारण्यात आलेले बहुतांशी अर्ज वैद्यकीय प्रमाणपत्र जोडले नसल्यामुळे नाकारले आहेत. तर काही अर्ज इतर जिल्ह्यातून/राज्यातून मान्यता मिळाली नसल्याने  प्रलंबित आहेत. वैद्यकीय कारणाबाबतचे अर्ज तात्काळ समन्वय साधून परवानगी दिली जात आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. 31400 अर्जांना परवानगी  दिली  गेली  होती  पण  त्यांची मुदत संपल्याचे  जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सोलापूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी एकूण  43720 नागरिकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्यापैकी  36652 जणांना परवानगी दिली आहे तर 7068 जणांचे अर्ज प्रलंबित आहेत. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!