सहस्त्र चंडी याग सोहळ्यामध्ये 65 ब्रह्मवृंद यज्ञ सोहळ्यात सहभागी

समर्थ भक्त चारुदत्त बुवा आफळे यांचे आजपासून कीर्तनाचे आयोजन


सातारा – पंचपाळी हौद दुर्गा माता मंदिर सहस्रचंडी यागानिमित्त पाठाचे पठण करताना ब्रह्मवृंद. (छाया – अतुल देशपांडे)


स्थैर्य, सातारा, दि. 8 ऑक्टोबर : येथील श्री पंचपाळी हौद दुर्गा माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सहस्त्रचंडी याग सोहळ्यामध्ये सध्या सातारा, कराड, फलटण, कोल्हापूर, सांगली, चिपळूण, कोकण येथून सुमारे 65 ब्रह्मवृंद यज्ञ सोहळ्यात सहभागी झालेले आहेत. यामध्ये वेदमूर्ती ओंकार शास्त्री बोडस, प्रसाद शास्त्री लिमये, वेदमूर्ती धनंजय शास्त्री कुलकर्णी, वेदमूर्ती अतुल शास्त्री आपटे यांचे समावेश हे विविध ठिकाणाहून आलेले ब्रह्मवृंद सकाळपासून या यज्ञ सोहळ्यात आहेत .यज्ञ सोहळ्यानिमित्त उभारण्यात आलेल्या पिठस्त देवतांचे मंडळामध्ये चतु षष्ठी भैरव मंडळ, सर्वतोभद्र मंडल, चतुषष्ठी योगिनी मंडल ,सप्तशती महायज्ञ मंडळ, एकलिंग भद्र मंडल, आदित्य आदी नवग्रह मंडळ, ब्रह्मादि मंडळ आणि मुख्य देवता श्रीयंत्र आणि सरस्वती ,महालक्ष्मी आणि दुर्गा रुपातील अंबाबाई ची प्रतिमा स्थापन करण्यात आलेली आहे. या वास्तुमंडलांमध्ये नवदुर्गा स्वरूपात मातीचे कलश ही पूजनासाठी बांधण्यात आले आहे.
या मंडप मंचावर बसवण्यात आलेली सुवर्ण अलंकारांनी युक्त अशी कोल्हापूर येथील अंबाबाई ची भव्य मूर्ती ही कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिराचे वेदमूर्ती मुनीश्वर शास्त्री यांचे कडून या यज्ञ सोहळ्यासाठी पाठवण्यात आलेली आहे ,अशी माहिती वेदमूर्ती ओंकार शास्त्री बोडस यांनी दिली.

सहस्त्रचंडी महायज्ञनिमित्त धार्मिक कार्यक्रमांंबरोबरच नजीकच्या समर्थ सदन सांस्कृतिक केंद्र येथे सायंकाळी सहा ते आठ या वेळेत विविध कीर्तन, प्रवचन, सत्कार संपन्न होत आहेत ,यामध्ये मंगळवार दि. 7 ऑक्टोबर ते गुरुवार दि. 9 ऑक्टोबर दरम्यान सायंकाळी सहा ते आठ या वेळेत पुणे येथील सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार समर्थ भक्त चारुदत्त बुवा आफळे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे .

शुक्रवार दि. 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य नागरी सत्कार व समारोपाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. रविवार दि. 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून मंगळवार दि. 14 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत कर्करोग तपासणी मोफत शिबिर तसेच विविध आजारांबाबत आरोग्य महाशिबिर आयोजित आयोजन करण्यात आले आहे . बुधवार दि. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या सहस्त्रचंडी यज्ञाच्या आयोजनासाठी दुर्गा माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय देशमुख ,उपाध्यक्ष राजेंद्र साळुंखे ,सचिव शिवाजी उर्फ प्रशांत तुपे ,उपाध्यक्ष शिवाजी भोसले कोषाध्यक्ष प्रेमचंद पालकर यांचेसह हरीष शेठ, विनायक चिखलगे तसेच सर्व विश्वस्त व कार्यकारणी सदस्य हितचिंतक विशेष परिश्रम घेत आहेत.

सहस्रचंडी महायज्ञ साठी भक्तांकरीता 80 जी कलमानुसार देणगीदारांना इन्कम टॅक्स म्हणजेच आयकर खात्यातून सवलत मिळणार आहे तसेच या महायज्ञा साठी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह मंडळचे अध्यक्ष सुभाषराव बागल, माजी नगराध्यक्ष अशोकराव मोने, समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी ,प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्रीधर कंग्राळकर,सातारा शिवसेना शहर प्रमुख निलेश मोरे, महेश राजेमहाडिक, चंद्रशेखर ढाणे, प्रकाश बडदरे तसेच सर्व साधक, सनातनी संस्था सातारा यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.


Back to top button
Don`t copy text!