फ्लॅट भाड्याने देण्याच्या बहाण्याने 60 हजारांचा लावला चूना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२० नोव्हेंबर २०२१ । सातारा । ओएलक्सवर फ्लॅट भाड्याने देणे आहे, अशी जाहिरात करून फ्लॅट भाड्याने देण्याऐवजी आपल्याच बँकेच्या खात्यातून ६० हजार रुपये गेल्याने घरमालकाला मनस्ताप सहन करावा लागला. ही घटना साताऱ्यातील गोडोली येथे घडली असून, याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.

दीपक गणपतराव माळी वय ५४, रा. पायरी प्लाझा, गोडोली, सातारा यांच्या मुलीने ओएलएक्सवर फ्लॅट भाड्याने देण्याची जाहिरात अपलोड केली. त्यानंतर माळी यांच्या पत्नीच्या मोबाइलवर मी सिंग बोलतोय, मी आर्मीमध्ये आहे. मला तुमचा ओएलएक्स ॲपरटाकलेल्या पत्यावरील फ्लॅट हा ५ डिसेेंबरपासून भाड्याने हवा आहे. असे सांगून त्यासाठी लागणारी कागदपत्रे संबंधित व्यक्तीने वॉटॲपवर पाठवली. त्यामुळे माळी यांचा विश्वास बसला. काहीवेळानंतर संबंधित व्यक्तीने मुलीचा आणि पत्नीचा गुगल पे नंबर मागवून घेतला. त्यानंतर दोघींच्या गुगल पे नंबरून एकूण ६० हजार ५०० रुपये संबंधित व्यक्तीने काढून घेतले. मोबाइलवर पैसे काढल्याचा एसएमएस आल्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.


Back to top button
Don`t copy text!