सातारा जिल्ह्यात 6 हजार 477 नवीन प्रवेश : गड्या आपल्या गावची झेडपीची शाळा बरी असाच सूर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. १४ : जिल्ह्यातील 1732 गावांपैकी अनेक गावांत केवळ वयोवृद्ध व्यक्ती असायच्या. बाकीच्या पोटापाण्यासाठी पुण्यमुंबईत असायचे. महात्मा गांधीजीनी खेड्याकडे चला हा संदेश दिला होता. त्याच्या उलटंच चित्र गेल्या दहा वर्षात तयार झाले होते. पटसंख्येअभावी गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडण्याची अवस्था झाली होती. यावर्षी उलट चित्र असून  करोनाच्या दहशतीमुळे पुण्यामुंबईतले चाकरमानी गावात तळ ठोकून आहेत. त्यांनी आपल्या मुलांना गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत ऑन लाईन प्रवेश मिळवला आहे. सातारा जिल्ह्यात 6 हजार 477 नवीन प्रवेश झाले आहेत. दुसर्‍या शाळेतून 520 प्रवेश तर एकूण 6 हजार 997 प्रवेश झाले आहेत. पहिलीसाठी 6 हजार 244 प्रवेश तर इतर वर्गाचे 753 प्रवेश झाले आहेत. त्यामुळे गड्या आपल्या गावची झेडपीची शाळा बरी असाच सूर आता दिसू लागला आहे.

गेली अनेक वर्षांपासून खेडी भकास आणि शहरे हाऊसफुल्ल झाली होती. गावाकडे वयोवृद्ध फक्त आणि तरुण सगळे पुण्यामुंबईत दिसायचे. या चित्रांमुळे राज्य शासनाने ही गावाकडे कमी पट असलेल्या शाळा ही बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सातारा जिल्ह्यातल्या काही कमी पटाच्या शाळा बंद करण्यात आल्या होत्या. करोना  चे जगावर संकट कोसळले आणि त्या संकटात शहरे लॉक डाऊन झाली. एक महिना, दोन महिने, तीन महिने झाले तरी  करोना  चा कहर कमी होत नाही. काही चाकरमानी लॉक डाऊनच्या सुरुवातीलाच गावाकडे सापडेल त्या वाहनाने आले. गावात राहू लागली. गावात चाकरमानी आल्याने गावात गर्दी दिसू लागली. कोरोनाच संकट शहरकडून गावाकडे आलं असलं तरी गाव ते गावच. त्यात आपल्या मुलांना आता गावच्या शाळेतच घालायचे येथेच शिकवायचे म्हणून ऑनलाइन प्रवेश घेतले. आता जिल्हा परिषदे शाळाची प्रवेश नोंदणी हाऊसफुल झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेत दर्जेदार शिक्षण..सातारा जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांत दर्जेदार शिक्षण दिले जाते.ग्रामीण भागातील शाळांमध्ये भौतिक सुविधा दिल्या जातात.काही शाळा सौर शाळा आहेत.शाळांमध्ये विद्यार्थाकरता जिम आहे. संगणक शिक्षण दिले जाते. प्रभावती कोळेकर प्राथमिक शिक्षणाधिकारी

आॅनलाईन प्रवेशअर्ज भरलेले विद्यार्थी

पाटण 1961, कराड 1649, वाई 877, खटाव 562, सातारा 492, जावली 424, महाबळेश्वर 420, कोरेगाव 274, फलटण 181, माण 119, खंडाळा 37, एकूण 6997

तालुका निहाय पट संख्या

तालुका मुले मुली एकूण

जावली 752 -786 – 1538, कराड 3721 – 3395 – 7116, कोरेगाव 1906 – 1862 – 3768, खटाव 2508 – 2212 – 4720, खंडाळा 1550 – 1403 – 2953, महाबळेश्वर 375 – 382 – 757, माण 1651 – 1493 – 3144, पाटण 2197 – 2216 – 4413, फलटण 2633- 2488- 5121, सातारा 2266 – 2186 – 4452, वाई 1755 – 1738 – 3493


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!