स्थैर्य, वाई, दि. २८ : वाई शहरात पालिकेच्या आरोग्य निरीक्षकास बाधा झाली होती.त्याच्या निकट सहवासात आलेले सहा जण बाधित झाले असल्याचा अहवाल आला आहे.तसेच शहरात आणखी एका डॉक्टरची पत्नी बाधित झाली असून वाई शहरात करोनाचा कहर कमी येईना झाला आहे. नव्याने वाई तालुक्यातील 16 जण बाधित झाले आहेत.
वाई शहर आणि तालुक्यातील करोना चे रुग्ण दररोज वाढत चालले आहेत. रात्रीच्या प्रसिद्ध झालेल्या अहवालात वाई शहरात आठ रुग्ण आढळून आले.हे सर्व निकट सहवासात आलेले आहेत. त्यात पालिकेचे सहा कर्मचारी आहेत. वाई पालिकेतल्या आरोग्य निरीक्षकास दोन दिवसांपूर्वी बाधा झाली होती.ते सध्या संचेती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या जे सहवासात आले होते त्यांचे स्वाब घेतले होते. त्यापैकी सहा जण पॉझिटिव्ह आले आहेत. आता त्या पालिका कर्मचाऱ्यांच्या कुटूंबातील सदस्यांना कोरोन टाइन करून त्यांचे स्वाब घेतले जाणार आहेत. काही अधिकाऱ्यांना ही होम कोरोन टाइन व्हावे लागले आहे. तसेच एका डॉक्टर पत्नीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ग्रामीण भागात पसरणी 5, बोरगाव 1, रेनावळे 1, शहाबाग 1 असे रुग्ण आढळून आले आहेत.