
दैनिक स्थैर्य | दि. ७ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
श्री दत्त इंडीया प्रा. लि., साखरवाडी (ता. फलटण) या साखर कारखान्याने सन २०२३ – २४ च्या चालू वर्षीच्या गळीत हंगामात दि. ६ फेब्रुवारी अखेर ६ लाख ४३ हजार ६५१ मे. टन ऊस गाळप केले असून त्यापैकी दि. १५ जानेवारी अखेर गाळपास आलेल्या उसाला प्रतिटन ३१०० रुपयांप्रमाणे १५५ कोटी ४७ लाख १५ हजार ५९३ रुपये ऊस उत्पादक शेतकर्यांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे प्रशासन अधिकारी अजितराव जगताप यांनी दिली. यावेळी जनरल मॅनेजर फायनान्स अमोल शिंदे, केन मॅनेजर सदानंद पाटील, शेतकी अधिकारी भागनवर, युनियन जनरल सेक्रेटरी राजेंद्र भोसले उपस्थित होते.
यावर्षीच्या गळीत हंगामात दि. १५ जानेवारी अखेर गाळपास आलेल्या ५ लाख १ हजार ५२१.०४६ मे. टन उसाला प्रतिटन ३१०० रुपयांप्रमाणे १५५ कोटी ४७ लाख १५ हजार ५९३ रुपये ७ हजार ४२९ ऊस उत्पादक शेतकर्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती प्रशासन अधिकारी अजितराव जगताप यांनी दिली आहे.
दरम्यान, गळीत हंगाम अद्याप वेगात सुरू असून मंगळवार, दि. ६ फेब्रुवारी अखेर ६ लाख ४३ हजार ६५१ मे. टन उसाचे गाळप झाले असून यावर्षी ८ लाख मे. टनाहून अधिक गाळपाचे उद्दिष्ट असून ते निश्चित पूर्ण होईल, अशी अपेक्षा प्रशासन अधिकारी जगताप यांनी व्यक्त केली आहे.