595 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 475 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा, दि.२: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 595 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 475 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

475 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 24, कराड 7, उपजिल्हा रुग्णालय फलटण 100, कोरेगाव 35, खंडाळा 49, रायगांव 20, पानमळेवाडी 101, मायणी 24, महाबळेश्वर 24, दहिवडी 32, तलमावळे 35, म्हसवड 24 असे एकूण 475 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने — 146350

एकूण बाधित — 38347

घरी सोडण्यात आलेले — 28655

मृत्यू — 1187

उपचारार्थ रुग्ण — 8505


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!