लोणंद नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी ५५ उमेदवार मैदानात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १४ डिसेंबर २०२१ । लोणंद । लोणंद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी १८ उमेदवारांकडून अर्ज मागे घेण्यात आल्यानंतर आता एकुण तेरा प्रभागांसाठी ५५ उमेदवार मैदानात  असल्याची माहीती निवडणूक निर्णय अधिकारी फलटणचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप आणि मुख्याधिकारी हेमंत ढोकले यांनी दिली.

आज अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेल्या बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्यात राजकीय पक्ष कितपत यशस्वी होणार याबाबत उत्सुकता होती. बहुतांश बंडखोरांची समजूत घालून मन वळवण्यात यश आले असले तरी काही बंडखोर उमेदवार मात्र आपल्या उमेदवारीवर ठाम राहीले असल्याने पक्षाच्या मातब्बरांची डोकेदुखी ठरणार आहेत.

आजच्या उमेदवारी माघार घेण्याची मुदत संपल्यानंतर चार प्रमुख पक्ष आणि अपक्ष असे एकुण ५५ उमेदवार मैदानात असणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सर्व १३ प्रभागातुन निवडणुक लढवत आहेत तर पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेली राष्ट्रीय काँग्रेस १२ जागांवर निवडणुक लढणार आहे तर भाजपने ११ जागांवर आपले उमेदवार ऊभे केले आहेत,  राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेना मात्र १० जागांवरच निवडणूक लढवत असून ९ जागा अपक्ष उमेदवार लढवत आहेत.

प्रभागनिहाय निवडणुक लढवत असलेले उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत, प्रभाग क्रमांक तीन या अनुसुचित जाती महिलांसाठी राखीव प्रभागात पाटोळे छाया सुर्यकांत, जगताप प्रतिभा गोरख, शेळके दिपाली निलेश, रिटे उर्मिला संतोष असे चार उमेदवार असणार आहेत. प्रभाग क्रमांक चार या सर्वसाधारण प्रभागातून बागवान सर्फराज शमशुद्दीन, पवार सचिन उत्तम , मुल्ला कय्युम अंबीर, शेळके सचिन तानाजी, माने गणेश बाजीराव, माळी प्रथमेश संजय हे सहा उमेदवार मैदानात असणार आहेत. प्रभाग क्रमांक पाच या सर्वसाधारण प्रभागातून कर्णवर रमेश मल्हारी, कचरे हेमंत प्रल्हाद, शेळके भरत शंकरराव, पवार नंदकिशोर तुळशीराम, खरात भूषण सुरेश असे पाच उमेदवार असणार आहेत. प्रभाग क्रमांक सहा या सर्वसाधारण महिलांसाठी राखीव प्रभागातून शेळके शकुंतला सचिन, शेळके राजेश्री रविंद्र, शेळके मनिषा हेमंत, माने कविता नंदकुमार असे चार उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक सात या अनुसुचित जातींसाठी राखीव प्रभागात डोईफोडे राजेंद्र सिताराम, कुचेकर आकाश सुनिल, गालिंदे अरुण गोविंद, गालिंदे ढगेश संपतराव, पलंगे मधुमती कैलास, सावंत दयानंद विठ्ठल असे सहा उमेदवार असणार आहेत. प्रभाग क्रमांक आठ हा अनुसुचित जमातीसाठी राखीव प्रभागातून राष्ट्रवादीकडून केदारी वैशाली विकास तर भाजपकडून डोनीकर ज्योती दिपक असे दोनच उमेदवार मैदानात असणार आहेत. प्रभाग क्रमांक नऊ या सर्वसाधारण प्रभागात शेळके रघुनाथ बाबुराव, शेळके अशोक कृष्णराव, शेळके-पाटील आनंदराव शंकरराव, शेळके शिवाजीराव शंकरराव असे चार उमेदवार उभे आहेत. प्रभाग क्रमांक दहा या सर्वसाधारण महिलांसाठीच्या प्रभागातून सिमा वैभव खरात, अपर्णा राकेश क्षीरसागर, प्रणाली सागर खरात, माया दत्तात्रय खरात असे चार उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक बारा या सर्वसाधारण महिलांसाठीच्या प्रभागातून भंडलकर स्वाती शरद, मणेर शाहीन अंजूम, इनामदार खुशबु सिकंदर, इनामदार रशिदा शब्बीरभाई, गुंडगे विजया नंदकुमार, कुसूम विश्वास शिरतोडे असे सहा उमेदवार असणार आहेत. तर प्रभाग क्रमांक तेरा या सर्वसाधारण महिलांसाठीच्या प्रभागात निंबाळकर मंगल विलास, घाडगे छाया सुभाष, स्वप्नाली संतोष गवळी, घाडगे तृप्ती राहूल या चार उमेदवार असणार आहेत.  प्रभाग क्रमांक चौदा या सर्वसाधारण महिलांसाठी राखीव प्रभागात कुंडलकर विजया शिवाजी, शेळके सुप्रिया गणेश, शेळके-पाटील प्राजक्ता संग्राम, माचवे अनिता बब्रुवान अशा चार उमेदवार असणार आहेत तर प्रभाग क्रमांक पंधरा या सर्वसाधारण प्रभागातुन जाधव नाना शंकर आणि कच्छी गणी जुसुफ या दोघांत सरळ लढत आहे. प्रभाग क्रमांक सतरा या सर्वसाधारण प्रभागात क्षीरसागर रविंद्र रमेश, लोखंडे शिवाजी नारायण, क्षीरसागर सचिन जयसिंग, यादव सुनिल विठ्ठल असे चार उमेदवार मैदानात असणार आहेत.

आज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी माघार घेतलेले उमेदवार पुढील प्रमाणे आहेत. रूपाली भास्कर चव्हाण,  घाडगे विमल भगवान,  गालिंदे सागर महेश, पाटोळे मेघा सुर्यकांत, धायगुडे रोहन विलास, सय्यद मिनाज अब्दुल रेहमान, क्षीरसागर तेजस रमेश, विठ्ठल रधुनाथ शेळके, भिसे अक्षय तानाजी, इनामदार शाहिन जाहंगिर , शेळके-पाटील हर्षवर्धन आनंदराव, शेळके-पाटील संग्राम आनंदराव, गायकवाड नंदा किरण, पवार हेमंत चंद्रकांत, शेळके अर्चना सागर, युवराज अनिल दरेकर, योगेश उत्तमराव क्षीरसागर आणि स्नेहलता आनंदराव शेळके-पाटील या अठरा उमेदवारांकडून आज अर्ज माघारी घेण्यात आला.

मंगळवार दिनांक १४ रोजी सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येणार असून त्यानंतर सर्व उमेदवार आणि सर्व पक्ष यांना निवडणूक आचारसंहिते बाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी हेमंत ढोकले यांनी सांगितले आहे.


Back to top button
Don`t copy text!