फिनटेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करण्यास ५२ टक्के गुंतवणूकदार उत्सुक: स्कोप सर्वेक्षण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २२ फेब्रुवारी २०२२ । मुंबई । उदयोन्मुख फिनटेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करण्यास ५२ टक्के गुंतवणूकदार उत्सुक असल्याचे नवीन युगाच्या बुटिक प्लॅटफॉर्म स्कोपच्या अंतर्गत सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. याउलट केवळ १२ टक्के गुंतवणूकदारांना ई-कॉमर्स विभागात गुंतवणूक करण्यात रस होता. याशिवाय, आधुनिक ग्राहकाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी नवोन्मेषकारी व अद्वितीय कल्पनांचा लाभ घेणाऱ्या एतद्देशीय उत्पादनाधारित स्टार्टअप्सना १७.६ टक्के गुंतवणूकदारांचा पाठिंबा मिळाला. उर्वरित १८.४ टक्के गुंतवणूकदारांनी बिझनेस-टू-बिझनेस (बी२बी) स्टार्टअप्सना पसंती दिली.

स्कोपचे संस्थापक आणि सीईओ अप्पाला साईकिरण म्हणाले, “उद्योगक्षेत्रातील नवीनतम प्रवाह समजून घेण्यासाठी सर्वेक्षण हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. यासंदर्भात, आम्ही विभागाधारित गुंतवणूक परिस्थितींतील व्यवसाय कौशल्याची कल्पना यावी म्हणून एक अंतर्गत सर्वेक्षण घेतले. स्कोपच्या अंतर्गत सर्वेक्षणातून असे दिसते की, फिनटेक हा स्टार्टअप परिसंस्थेतील सर्वाधिक पसंती असलेला उद्योग आहे, तर ई-कॉमर्सला सर्वांत कमी पसंती आहे. हे विश्लेषण उद्योजक परिसंस्थेतील अनेक संबंधितांना, एखाद्या विशिष्ट उद्योगातील कंपन्यांची कामगिरी कशी राहील या आडाख्यांबाबतची, अर्थपूर्ण माहिती पुरवते.”

उद्योजक, गुंतवणूकदार समूह आणि उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञ यांच्यातील अंतर भरून काढण्याच्या उद्देशाने सुमारे चार महिन्यांपूर्वी अधिकृतरित्या स्कोप (SCOPE)ची सुरुवात करण्यात आली. नुकतेच करण्यात आलेले सर्वेक्षण खात्रीशीर विभागाधारित गुंतवणूक डेटा प्राप्त करण्यासाठी स्कोपकडे आलेल्या अर्जांमधील माहितीच्या आधारे करण्यात आले. प्रागतिक रितीने वाढत असलेल्या स्टार्टअप परिसंस्थेचे एक माहितीपूर्ण चित्र या सर्वेक्षणातून उभे राहते तसेच अतिआकर्षक (हाय-इंटरेस्ट) क्षेत्रांच्या आर्थिक व वित्तीय संभावनांचे मूल्यांकन करणे संबंधितांना शक्य होते. गुंतवणूकदार, उद्योजक आणि उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञांमधील नातेसंबंधांची जोपासना करण्यात मदत करण्याच्या दृष्टीने, उद्योजक परिसंस्थेतील, रोमांचक प्रवाहांचे विश्लेषण करण्यासाठी स्कोप अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले.

स्कोप हा २१व्या शतकातील उपयोजनाचे प्रतीक आहे, याचीही नोंद घेणे येथे समर्पक आहे. हे उपयोजन सर्व उद्योजकांना, त्यांची पार्श्वभूमी, वय, सिंग किंवा अर्हता न विचारात घेता, साइन इन करून घेते आणि स्टार्टअप परिसंस्थेतील अनुकूल लोक शोधण्यास मदत करते. हा प्लॅटफॉर्म प्रामुख्याने कनेक्ट, कोलॅबरेट आणि क्रिएट या तीन सी वर लक्ष केंद्रित करतो. स्थापनेपासून स्कोपने अनेक प्रभावी गुंतवणूकदारांना तसेच उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञांना ऑनबोर्ड करून घेतले आहे.


Back to top button
Don`t copy text!