
स्थैर्य, सातारा दि.२७: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 513 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 181 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
181 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
फलटण येथे 52, खंडाळा येथे 58, रायगाव येथे 49, पानमळेवाडी 17, महाबळेश्वर 5 असे एकूण 181 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने — 124801
एकूण बाधित –35401
घरी सोडण्यात आलेले —25514
मृत्यू — 1079
उपचारार्थ रुग्ण — 8808