हिंगणगाव जि. प. गटातील वाड्या-वस्त्यांचा अंधार दूर होणार! आ. सचिन पाटील व माजी खा. रणजितसिंह यांच्या माध्यमातून ५० सौर दिवे मंजूर


हिंगणगाव जिल्हा परिषद गटातील सर्व गावांमधील वाड्या-वस्त्यांवर प्रकाश व्यवस्था करण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून ५० सौर दिवे मंजूर करण्यात आले आहेत. जि.प. सदस्या ॲड. किरण नलवडे यांनी याबाबत आभार मानले आहेत.

स्थैर्य, फलटण, दि. 26 मार्च : ग्रामीण भागातील विकासकामे थेट वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहोचवण्याच्या आश्वासनाची आता खऱ्या अर्थाने ‘वचनपूर्ती’ होताना दिसत आहे. फलटण तालुक्यातील हिंगणगाव जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावासाठी आणि त्याअंतर्गत येणाऱ्या वाड्या-वस्त्यांवरील अंधार दूर करण्यासाठी शासनाकडून तब्बल ५० सौर दिवे (Solar Lamps) मंजूर करण्यात आले आहेत.

माढा लोकसभेचे माजी खासदार श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण-कोरेगावचे आमदार श्री. सचिन पाटील आणि सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून आणि माध्यमातून या महत्त्वपूर्ण विकासकामाला मंजुरी मिळाली आहे. या निधीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांची, विशेषतः महिला व शेतकऱ्यांची रात्रीच्या वेळी होणारी गैरसोय कायमची दूर होणार आहे.

‘वचनपूर्ती सुरू, विकासकामे पोहोचणार’

हिंगणगाव गटाच्या जिल्हा परिषद सदस्या ॲड. सौ. किरणताई निलेश नलवडे यांनी सातत्याने या भागातील वाड्या-वस्त्यांवरील गैरसोयींचा प्रश्न नेत्यांकडे मांडला होता. या प्रश्नाची तातडीने दखल घेत तब्बल ५० सौर दिव्यांना मंजुरी देण्यात आली आहे. या विकासकामाबद्दल ॲड. किरणताई नलवडे यांनी समस्त हिंगणगाव गटाच्या वतीने सर्व नेत्यांचे जाहीर व हार्दिक आभार मानले आहेत.

गावनिहाय मंजूर झालेले सौर दिवे खालीलप्रमाणे:

  • ५ दिवे: ताथवडा

  • प्रत्येकी ४ दिवे: सासवड, तांबवे

  • ३ दिवे: हिंगणगाव

  • प्रत्येकी २ दिवे: आळजापूर, कापशी, कोऱ्हाळे, झडकबाईचीवाडी, टाकुबाईचीवाडी, पिराचीवाडी, बिबी, मलवडी, मानेवाडी, वडगाव, वाघोषी, आदर्की खुर्द, आदर्की बुद्रुक, आरडगाव, चांभारवाडी, शेरेचीवाडी (हिं.) आणि सालपे.

या सर्व गावांच्या हद्दीतील आणि गावालगतच्या वाड्या-वस्त्यांवर हे सौर दिवे लवकरच बसविण्यात येणार आहेत. रस्ते, वीज आणि पाण्यासारख्या मूलभूत सुविधा थेट वाड्या-वस्त्यांवर पोहोचत असल्याने हिंगणगाव परिसरातील नागरिकांमधून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.


Back to top button
Don`t copy text!