घोस्ट किचनची ५० कोटींची गुंतवणूक योजना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १७ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । घोस्ट किचन्स इंडिया प्रा. लि. हे इंटरनेट रेस्टॉरंट टेक व्यासपीठ आहे. कंपनी कमी वापर क्षमता असलेले रेस्टॉरंट्स व क्लाऊड किचन्सना कोणत्याही गुंतवणूकीशिवाय अधिक उत्पन्न कमावण्यास मदत करते. कंपनीने गुजरातमधील भरूच येथे आपल्या १००व्या फुलफिलमेंट सहयोगीच्या उद्घाटनाची घोषणा केली आहे आणि कंपनीचा पुढील एका वर्षात ५० कोटी रूपयांची गुंतवणूक करत आपली ब्रॅण्ड उपस्थिती वाढवण्याचा मनसुबा आहे.

गुजरातमधील भरुचमध्ये ५०व्या आउटलेटसह घोस्ट किचन्स गेल्या १० महिन्यांत इंटरनेट रेस्टॉरंट्सची आकडेवारी एकूण १२०० रेस्टॉरंट्सपर्यंत घेऊन जात भारतातील झपाट्याने वाढणारी इंटरनेट रेस्टॉरंट तंत्रज्ञान व्यासपीठ बनली आहे. सध्या, सर्व प्रमुख महानगर केंद्रांसह ३५ शहरांमध्ये घोस्ट किचन्स कार्यरत आहेत. ब्रॅण्ड पश्चिम भारतातील ४० सहयोगी आणि दक्षिण, पूर्व व उत्तर भारतात प्रत्येकी २० सहयोगींसह भारतभरात कार्यरत आहे. कंपनीचे आणखी ५० सहयोगी असणार आहेत, जे पुढील २ महिन्‍यांमध्‍ये कार्यरत होतील.

घोस्ट किचन्सचे सीओओ श्री. कुमार गौरव म्हणाले, ‘’स्थापनेपासून आम्‍ही अलपावधीतच यशस्वी गाथा रचल्या आहेत. आज आमचे अनेक सहयोगी आहेत, ज्यांनी विविध स्टोअर्स सुरू केले आहेत. याचे श्रेय आमच्या प्रोप्रायटरी तंत्रज्ञानाला जाते, जे लहान रेस्टॉरंट मालकांना ग्राहकांच्या भावना समजण्यास सक्षम करत आहे. यामुळे त्यांना ग्राहकांना सर्वोत्तम सुविधा देण्यास मदत होते. परिणामत: त्यांना सर्व ब्रॅण्ड्सवर अधिक फूड डिलिव्हरी ऑर्डर्स निर्माण करण्यास मदत होते. आम्‍ही भारतातील प्रत्येक रेस्टॉरंटला फायदेशीर बनवण्याचे आमचे दृष्टिकोन पूर्ण करण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने काम करत आहोत.’’

घोस्ट किचन्स अॅग्रीगेटर्सच्या अल्गोरिदम्सची माहिती नसल्यामुळे पुरेशा फूड डिलिव्हरी ऑर्डर्स निर्माण करण्यासंदर्भात रेस्टॉरंट्सच्या समस्‍येचे निराकरण करते. घोस्ट किचन्सने प्रदान केलेले अद्वितीय इंटरनेट रेस्टॉरंट तंत्रज्ञान व्यासपीठ बाजारपेठेतील एकमेव सोल्यूशन आहे आणि ही सेवा निर्माण व प्रदान करणारी दुसरी कोणतीच कंपनी नाही.

घोस्ट किचन्सने निधीच्या २ फेऱ्यांमध्ये १.२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स उभारले आहेत. प्रमुख गुंतवणूकदारांमध्ये झँडर ग्रुपचे संस्थापक सिद योग यांच्या फॅमिली ऑफिसची खाजगी गुंतवणूक शाखा युज व्हेंचर्स, ढोलकिया व्हेंचर्स, सालारपुरिया फॅमिली ऑफिस, ट्रेमिस कॅपिटल, शंकर नारायणन आणि इतर प्रख्यात एंजल गुंतवणूकदार यांचा समावेश आहे.


Back to top button
Don`t copy text!