ऊसतोड करणार्‍या ठेकेदाराकडून शेतकर्‍याची ५ लाखांची फसवणूक; पैसे देण्यास टाळाटाळ, गुन्हा दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ११ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
शिंदेनगर (ता. फलटण) येथील शेतकरी बापूराव जगन्नाथ रणवरे यांच्याकडून ऊसतोड करणार्‍या ठेकेदाराने ५ लाखांचा अ‍ॅडव्हान्स घेऊन ऊसतोडीसाठी मजूर टोळी न दिल्याने तसेच ५ लाखांची घेतलेली आगाऊ रक्कमही वारंवार फोन करूनही परत न दिल्याने व दमदाटी केल्याने बापूराव रणवरे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात ठेकेदाराविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतची माहिती अशी, शिंदेनगरचे शेतकरी बापूराव जगन्नाथ रणवरे यांनी कुशा गर्जा पटले (रा. आगरीपाडा, ता.धडगाव, जिल्हा नंदुरबार) या ऊसतोड टोळीच्या ठेकेदारास आपला ऊस तोडण्यासाठी ५ लाखांची रक्कम दिली होती; परंतु ठेकेदार कुशा गर्जा पटले यांनी बापूराव रणवरे यांचा ऊस तोडण्यासाठी ऊसतोड मजुरांची टोळी न दिल्याने तसेच ५ लाखांची घेतलेली रक्कमही परत न करता दमदाटी केल्याने रणवरे यांनी कुशा पटले याच्याविरोधात दि. १० फेब्रुवारी २०२३ रोजी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी ठेकेदार कुशा पटले याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सपोनि भोसले करत आहेत.

४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे

फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.

संपर्क : 8888006611 (WhatsApp)


Back to top button
Don`t copy text!